

Mumbai News : डोंबिवलीतील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या रमेश म्हात्रे यांच्याकडे आता पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजवली आहे. त्यामुळे येत्या काळात म्हात्रे यांच्यावर पक्षातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे. महिला डॉक्टरला मारहाण केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणांत टीका केली जात आहे. त्यासोबतच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षातून केली जात होती.
शिवसेनेकडून नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डॉक्टर मारहाण प्रकरणी तुमच्यावर पक्षाने कारवाई का करु नये, अशी विचारणा रमेश म्हात्रे यांना पक्षाने केली आहे. रमेश म्हात्रे सह अन्य तिघांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिला डॉक्टरला मारहाण केल्याने पोलिसांनी त्यांना गुरुवारीच अटक केली होती. त्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 13 जुलैपर्यंत, म्हणजेच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
दर सहा तासांनी वैद्यकीय तपासणी करा आणि गोळ्या औषधाची गरज असल्याने न्यायालयाकडे एक दिवसाची पोलीस कोठडी द्या असे सांगितले. मात्र न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांना आरोपी रमेश म्हात्रे याला गोळ्या औषधाची गरज असल्याने तब्येत खराब झाल्यास दर सहा तासांनी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी पोलिसांना न्यायालयाने सूचना दिली आहे.
शिवसेना पक्षाकडून रमेश म्हात्रे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षाकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.