<div class="paragraphs"><p>Ramdas Kadam-Anil Parab</p></div>

Ramdas Kadam-Anil Parab

 

Sarkarnama 

कोकण

`परब यांच्या बेकायदा बांधकामाची माहिती रामदास कदमांनी नाही तर मी दिली होती`

अमोल कलये

रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यातील वादात आता नवीन ट्विस्ट आला आहे. परब यांच्या रिसाॅर्टविषयी कदम यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना माहिती पुरविल्याचा आरोप परब समर्थकांकडून केला जात होता. आता यात एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दावा केला असून परब यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत किरिट सोमय्या यांना आपण ही माहिती दिल्याचा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला आहे. याचा परब यांच्याशी संबंध नसल्याचेही काझी यांचे म्हणणे आहे.

माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांसोबत रिझवान काझी यांनी ही माहिती देत दावा केला आहे. आपण ७ मार्च २०१७ पासून  अनेक कार्यालयामध्ये वादग्रस्त रिसाॅर्टसंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. मिळालेली माहिती आपण किरिट सोमय्या यांना दिली. आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे  यांना आपण सोमय्यांचा मोबाईल नंबर दिला. आरटीआय मध्ये मिळालेल्या माहितीनंतर आपण या साऱ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे काझी यांनी स्पष्ट केले. नेत्यांचे एकमेकांवरील आरोप म्हणजे राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे. या आरोप-प्रत्यारोपांत बेकायदा बांधकामाचा विषय मागे पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री असून त्यांचे दापोलीत रिसाॅर्ट आहे. अनिल परब यांच्याविरोधातील सारी माहिती रामदास कदम यांनी दिल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यांनी पुढे आणलेल्या एक ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांचा आवाज असल्याचा मनसेचा आरोप होता.तसेच दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधत असल्याचे सांगितले जात होते.

आतापर्यंत या नाट्यात काझी यांचा प्रवेश झालेला नव्हता. मात्र काल कदम यांनी थेट परब यांच्यावर हल्लाबोल करत ते आपली राजकीय करियर उध्वस्त करण्याचे मागे असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्याविरोधात बोलणे म्हणजे शिवसेनेच्या विरोधात बोलणे, असे नाही, असा दावा केला होता. काझी हे परब यांचे रिसाॅर्टच्या मागे का लागले, याचा उलगडा मात्र झाला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT