परब हे काय शिवसेनाप्रमुख आहेत का? रामदास कदमांचा हल्लाबोल

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
रामदास कदम 

रामदास कदम 

Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. 'अनिल परब शिवसेनेचे गद्दार आहेत. ते रत्नागिरीत शिवसेना, माझे आणि माझ्या मुलाचे राजकीय कारकीर्द संपवण्याचा घाट घालत आहे, ते रत्नागिरीतील मतदारसंघ आणि नगरपंचायती राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला. याच वेळी त्यांनी शिवसेना संपणाऱ्यांवर आवरा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळकळीचे आवाहनही केले आहे.

शनिवारी ( १८ डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मंत्री अनिल परब आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''अनिल परब शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. कोकणातून शिवसेना संपवण्यासाठी ते मला आणि माझ्या मुलाला संपवायला तीन दिवस ठाण मांडून बसले आहेत. पण रत्नागिरीचे पालकमंत्री असूनही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सोडता ते कधीही जिल्ह्यात येत नाहीत, त्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही. रत्नागिरीतील मतदार संघ आणि नगरपंचायती राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघालेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

<div class="paragraphs"><p>रामदास कदम&nbsp;</p></div>
चिंता वाढली! बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तीलाच ओमिक्रॉनची बाधा

या बाबत माझा मुलगा योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितलं आहे. पण अनिल परबांची भाषा अशी की तू राष्ट्रवादीचा नेता आहे. पण अनिल परब यांनी स्थानिक नेत्यांना डावलून राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन वर्षात मी मातोश्रीवर गेलो नाही, मंत्रालयात गेलो नाही. मी अडीच वर्षांपुर्वीच निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. माझ्या मुलाचे करियर आताच सुरु झाले आहे. पण त्याचेही करियर संपण्यासाठी अनिल परब प्रयत्न करत आहेत.

शिवसेना संपवण्यासाठी परबांनी आमदारांना निधी देणार नसल्याचे जाहीर केले आहे. ''परब हे काय शिवसेनाप्रमुख आहेत का? असा सवाल रामदास कदमांनी यावेळी उपस्थित केला. कोकणात राष्ट्रवादी शिवसेनाला संपवायला निघालीआहे. शिवसेनेच्या नेत्यांना राष्ट्रवादी प्रवेशासाठी ५ कोटींची ऑफरही दिल्याचा आरोप त रामदास कदम यांनी केला आहे. मला संपवा, पण माझ्या मुलाला का त्रास देता, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com