Sindhudurg cooperative bank fraud controversy, Rajan Teli, Nilesh Rane And Nilesh Rane sarkarnama
कोकण

Nilesh Rane : शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेलींना नीलेश राणेंचे बळ!, भावावर केलेल्या आरोपांनाही लावला "फुलस्टॉप"

Nilesh Rane clarifies Rajan Teli’s allegations on Nitesh Rane : नुकताच तळकोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर विश्वासू मानले जाणारे राजन तेली यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट विरोधक असणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केला.

Aslam Shanedivan

  1. राजन तेली यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.

  2. नीलेश राणे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देत तो विषय आता संपल्याचे सांगितले.

  3. त्यांनी सांगितले की, बँकेत काही चुकीचे झाले असल्यास ती दुरुस्त केली जाईल.

Sindhudurg News : मुळ शिवसेनेत फुट पडल्यापासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. आनेक मात्तबर नेतेही पक्षाला रामराम करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश करत आहेत. नुकसाच असाच एक मोठा आणि ठाकरेंना धक्का देणारा पक्ष प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत दसऱ्याला झाला. तळकोकणातील माजी आमदार राजन तेली यांनी भगवा हातात घेत शिवबंधन तोडले. या प्रवेशाची चर्चा सुरू झाली असतानाच त्यांनी दुसऱ्याच दिवशी थेट भाजप नेते तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंवर बॉम्ब फोडला. यानंतर शिवसेना आमदार नीलेश राणे यावर कोणती प्रतिक्रिया देतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. जी आता समोर आली आहे.

राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपांमुळे तळकोकणासह राज्याच्या वर्तुळात खळबळ उडाली. तर तळकोकणात पुन्हा एकदा तेली विरुध्द राणे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच या प्रकरणात तेलींनी केलेले आरोप शिवसेना आमदार नीलेश राणेंना मान्य आहेत? असा सवाल देखील राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता.

ज्यावर आता नीलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरुपी वैरी नसतो, असे म्हणत तेली यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच तेली यांच्या संघटनात्मक कौशल्याचा उपयोग करून सिंधुदुर्गात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर राजन तेली आता आमच्याबरोबर आले असून पुढील काळात आणखीही काहीजण येतील. आपण आमदार म्हणून आपण त्यांच्या पाठीशी आहोत असेही आश्वासन नीलेश राणेंनी दिले आहे.

यावेळी तेली यांनी, जिल्हा बँकेवरून केलेल्या आरोपांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. त्यालाच जोडून तेली यांनी थेट नितेश राणेंवर जे आरोप केले त्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी तेली यांना थांबवत नीलेश राणे यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, राजन तेली यांना सिंधुदुर्ग बँकेच्या नोटीस आल्या होत्या. ज्यात माध्यमांनी त्यात ट्विस्ट निर्माण केल्याचे खुलासा त्यांनीच केला होता.

ज्या बातम्या आल्या त्यावर उत्तर म्हणून ते बोलले. त्यांचा कोणावर टीका करण्याचा उद्देश नव्हता. आधी जे काही ते बोलले. ते त्यांचे व्यक्तिगत विषय होता. पण आता ते युतीमध्ये आले आहेत. त्यामुळे आता तो प्रश्न राहिलेला नाही, तो विषय आता संपवला. तरीही जिल्हा बँकेत काही चुकीचे झाले असेल, चुकीचे होत असेल तर ते आम्ही दुरुस्त करून घेऊ, असेही नीलेश राणेंनी म्हटलं आहे.

आता आमच्याकडून कोणावरही वैयक्तिक टीका होणार नाही. त्यांच्याही मनात काही शंका असतील तर त्या दूर केल्या जातील. पण जो ज्या पक्षात असतो त्या पक्षाप्रमाणे भूमिका घ्याव्या लागतात. मात्र कितीही ताणलं तरी ते तोडण्याची वेळ तेली यांनी येऊ दिली नाही. आता तर आम्ही राणे, तेली आणि केसरकर एकत्र आलो असून ही सगळी किमया एकनाथ शिंदे साहेबांची असल्याचेही नीलेश राणे म्हणाले.

...तर आम्ही स्वतंत्र लढू

नीलेश राणे यांनी आगामी राजकारणाचे संकेत देत महायुती झाली तरी ठीक, अन्यथा स्वतंत्र लढण्याचीही तयारी सुरू केल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. तसेच युतीबाबात निर्णय वरिष्ठ घेतील, पण ठाकरे गटातील काही रिकामटेकड्या लोकांना आता अधिकाऱ्याला मारहाण करणे व टीका करणे या पलीकडे काही काम राहिलेले नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना सुनावले आहे.

FAQs :

प्र.1: राजन तेली यांनी कोणावर आरोप केले होते?
👉 त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.

प्र.2: नीलेश राणेंनी या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली?
👉 त्यांनी सांगितले की, हा विषय आता संपला आहे आणि राजन तेली आता युतीत आहेत.

प्र.3: राजन तेली सध्या कोणत्या पक्षात आहेत?
👉 त्यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्र.4: नीलेश राणेंनी बँकेबाबत काय म्हटले?
👉 त्यांनी सांगितले की, बँकेत काही चुकीचे झाले असल्यास ते स्वतः दुरुस्त करतील.

प्र.5: या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 या घडामोडींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटातील अंतर्गत मतभेद कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT