निलेश राणे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकणातील जंगलतोड आणि वनखात्याच्या कारभारावर तिखट टीका केली.
त्यांनी नाव न घेता गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा आहे.
कोकणातील जंगलतोडीचा मुद्दा आणि महायुतीतील अंतर्गत वाद अधिवेशनात उफाळून आला.
budget session rane Vs naik : शिवसेनेचे नेते आमदार निलेश राणेंनी गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकणातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जंगलतोडीवरून आणि वनखात्याच्या ढिसाळ कारभारावरून अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. जे डीओफओ भरलेले आहेत ते सर्व अमराठी असून त्यांना आमच्या मालवणी भाषेतल्या तक्रारी कशा समजणार, किती तक्रारी करायच्या? वनमंत्री केवळ टीआरपी मिळवण्यात व्यस्त असून, त्यांच्या कार्यकाळात वनखात्याचा टांगा पलटी झाल्यासारखं वाटतं. टोला राणेंनी लगावला आहे. यामुळे आता ठाण्यात सुरू झालेल्या शिंदे-नाईक वाद आणि महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची परिणीती थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत असून ठाण्यातील वाद देखील आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला जात असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याची धार दिसून आली. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात कोकणातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जंगलतोडीवरून आणि वनखात्याच्या ढिसाळ कारभारावरून तोफ डागली. आपल्या भाषणात गणेश नाईक यांच्या वनखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अत्यंत तिखट शब्दांत टीका केली.
निलेश राणे यांनी, एकीकडे राज्यात कोट्यवधी झाडे लावण्याचे नियोजन असताना कोकणात मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ही तोड नेमकी कोणासाठी होत आहे, कशासाठी होत आहे, असा प्रश्न पटलावर ठेवला. तसेच वनमंत्री केवळ टीआरपी मिळवण्यात व्यस्त असून, त्यांच्या कार्यकाळात वनखात्याचा टांगा पलटी झाल्या सारखं वाटतं असल्याचे म्हणत नाईक यांना लगावला आहे. राणेंनी वनखात्याचा टांगा पलटी, असे वक्तव्य केल्यानेच आता शिंदे विरुद्ध नाईक वाद अधिवेशनात देखील चर्चेचा विषय ठरल्याची चर्चा आहे.
नेमकं काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे यांनी अधिवेशनात कोकणातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जंगलतोडी आणि वनखात्याच्या ढिसाळ कारभारावरून अधिवेशनात जोरदार टीका केली. त्यांनी, माझ्या मतदारसंघातील सिंधुदुर्ग तालुक्यात सर्वाधिक वनक्षेत्र असून राज्यात कोट्यावधी वृक्ष लागवडीची घोषणा देखील करण्यात आली आहे. आताही वृक्ष लागवडीची घोषणा होताना दिसते. पण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कोकण प्रांतातच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जातेय. पण ही नेमकी कशासाठी? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तर या होणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगलच्या – जंगल नष्ट होत असून जंगलातील जनावरे मानवी वस्तीत शिरत आहेत. यातूनच मानव विरुद्ध वन्यप्राणी असा संघर्ष होत आहे. कोकणातील शेतकरी आज दिवसाढवळ्या शेतात जायला, शेती करायला घाबरत आहे. यामुळे तक्रारी करूनही वन खात्याकडून कोणीही प्रतिसाद दिला जात नाही. यामुळे असे वाटते की वनखात्याचा टांगा पलटी झाला आहे की काय. प्रामुख्याने तळकोकणात मोठ्या प्रमाणात अमराठी वन अधिकाऱ्यांची भरती करून ठेवली आहे. त्यांना मालवणी भाषेतील तक्रार काय कळणार असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने टार्गेट केलं जात असून वारंवार कडाडून टीका केली जातेय. नुकताच गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात शिंदे यांच्यावर टीका करताना, शिंदे यांच्याकडे हरामाचा पैसा आहे. वरिष्ठांनी परवानगी दिली तर त्यांचा टांगा पलटी करून टाकू, ठाणे जिल्ह्यातून त्यांचे अस्तित्व मिटवून टाकू.
शिंदे यांनाच काय तर त्यांच्या मुलाला कायमचे माजी करून टाकू अशी वक्तव्ये केली होती. ज्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली होती. शिंदेंच्या आमदार खासदारांकडून सडेतोड उत्तर देण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची शक्यता असून आमदार निलेश राणे यांनी राज्यपालावरील अभिभाषणावर उत्तर देताना यावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी वनखात्याला लक्ष करत वनखात्यात अत्यंत भोंगळ कारभार सुरू असल्याचा दावा केला आहे.
1. निलेश राणेंनी कोणत्या मुद्द्यावर टीका केली?
कोकणातील जंगलतोड आणि वनखात्याच्या कारभारावर त्यांनी टीका केली.
2. गणेश नाईक यांचे नाव थेट घेतले का?
नाही, त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा आहे.
3. वाद कोणत्या ठिकाणी उफाळून आला?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आला.
4. डीओएफओ संदर्भात काय आरोप करण्यात आले?
डीओएफओ अमराठी असल्याने स्थानिकांच्या तक्रारी समजत नसल्याचा आरोप करण्यात आला.
5. या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
महायुतीतील अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.