

Mumbai News: राज्यात नुकत्याच झालेल्या नगर पंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीवेळी तळकोकणात भाजप आणि शिवसेनेतला प्रचंड वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून 25 लाख रुपये एका भाजप कार्यकर्त्याच्या घरात कसे आढळून आले? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.ज्यानंतर हा संघर्ष अजून पेटल्याचं चित्र होतं.पण आता निलेश राणेंनी भाजपसोबतचा वाद एका झटक्यात मिटवला आहे.
शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोपांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांवेळीच महायुतीतील राजकीय वातावरण तापलं होतं. याचदरम्यान,सिंधुदुर्गातील मालवण,कणकवलीसारख्या ठिकाणी युतीधर्म पाळले गेले नसल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेतला वाद चिघळतच गेला होता.
आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी गुरुवारी(ता.25) त्यांच्या सोशल मीडियावरील 'X'वर या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्यांनी "आज भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भेट घेतली..असं लिहिलं आहे.
राज्यातील निवडणुकीनंतर हिवाळी अधिवेशनावेळी रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.त्याचवेळी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण हे मला मोठ्या भावासारखे आहेत, असंही म्हटलं होतं.या भेटीची मोठी चर्चा त्यावेळी झाली होती.
निलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान,रवींद्र चव्हाणांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाण आणि माझं कधीही शत्रुत्व नाही आणि कधीच नव्हतं. चव्हाण माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच आहेत. मला त्यांनीच आज बोलावून घेतलं.ते ज्येष्ठ असून मोठ्या भावाप्रमाणे आहेत.त्यामुळे मी जाऊन त्यांना भेटल्याचं सांगितलं होतं.
रवींद्र चव्हाण आणि माझ्यात कधी टोकाचा वाद झालाच नाही.निवडणुकीच्या काळात जे बोलायचं होतं, जे नजरेसमोर आलं त्याचे पुरावे मी निवडणूक आयोगासमोर दिल्याचंही सांगितलं होतं. तसेच चव्हाण हे मला मोठ्या भावाप्रमाणे असून त्यांनी मला आशीर्वाद दिले असंही म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.