Konkan News : गुहागर येथील सभेसाठी माजी खासदार नीलेश राणे यांचा ताफा मुंबईवरून गुहागरकडे जात होता. मात्र, हा ताफा चिपळूण येथे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर येताच मोठा गोंधळ निर्माण झाला. गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन राडा झाला. यामुळे राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पेटला आहे. या राड्यानंतर पार पडलेल्या सभेत राणे यांनी जाधवांवर सडकून टीका केली आहे. (Konkan Political News)
नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी सभेत भास्कर जाधवांवर हल्लाबोल केला. राणे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आमच्यावर बोलण्याचा अधिकार फक्त ठाकरेंनाच आहे. भास्कर जाधव आता तू राहशील तर कुठेही सभा घे, महाराष्ट्रात त्या ठिकाणी हा नीलेश सभा घेणार लक्षात ठेव, असा इशारा राणे यांनी दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे कोणाशी पटले नाही. आजवर जिल्ह्यात रामदास कदम, उदय सामंत, सुनील तटकरे कोणाशीही पटले नाही. आता या भास्कर जाधवचा एक दिवस तुझा बाजार उठवला नाही तर नीलेश राणे नाव सांगणार नाही, असा सज्जड इशारा नीलेश राणे यांनी दिला आहे. कुडाळ मालवण येथे खर्च करणार तेवढा खर्च गुहागरवर करणार, पण भास्कर जाधवला आता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही," असाही इशारा राणे यांनी दिला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.