Nitesh Rane News : 'तो स्वस्तात परत गेला..!' नितेश राणे कोणाला म्हणाले...

Commentary on Ashok Chavan's resignation : अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये यावे यासाठी कोणताही दबाव नव्हता. विरोधक त्यांच्या नेत्यांची काळजी घेत नाहीत.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समर्थन केले. वागळे कुणी पत्रकार नाही. तो स्वस्तात परत गेला, पुणे भाजपचं काम अपूर्ण असून ते त्यांनी पूर्ण करावं, नाहीतर मला बोलवा, अशी धमकीच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम राणे यांच्या उपस्थितीत झाला. वागळे यांचा एकेरी उल्लेख करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुण्यात कार्यक्रम केला हे योग्यच केले. त्याला पत्रकार म्हणून तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका. ती विकृती आहे, असे म्हणत सिंधुदुर्गात आल्यानंतर त्याचा योग्य तो समाचार घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

Nitesh Rane
Ashok Chavan : अखेर ठरलं! चव्हाणांची आजपासून नवी इनिंग; म्हणाले, "माझ्या..."

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना राणे म्हणाले, भाजपमध्ये यावे यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. विरोधक त्यांच्या नेत्यांची काळजी घेत नाहीत. त्यामुळे नेते असे निर्णय घेत आहेत. भाजपशिवाय पर्याय नाही, याची जाणीव त्यांना झाली असावी. कोणत्या पक्षात भवितव्य आहे, हे ओळखूनच त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुंडासमवेतची संजय राऊत यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेले फोटो, मराठा आरक्षण, यावर त्यांनी भाष्य केले. 'जे नेते भाजपमध्ये येत आहेत. ती काही लहान मुले नाहीत. जे नेते येत आहेत, त्याची कारणे वेगवेगळी आहेत. चव्हाण यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. काँग्रेस सोडताना आमचीही कारणे वेगळी होती.

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे कुठे असतील ते समजेल...

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 हून अधिक जागा मिळतील. या निवडणुकीनंतर उद्ध‌व ठाकरे मातोश्रीवर असतील की जेलमध्ये हे दिसेल. ठाकरे यांनी भाजपची चिंता करण्याएवेजी स्वत:ची आणि मुलाची काळजी करावी. महाविकास आघाडीची वाट लागली आहे.

संजय राऊत जेथे जातात, तेथे कामय अशीच परिस्थिती होते. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस त्यांनी संपविली आहे. संजय राऊत यांच्या छायाचित्राचा संग्रह आमच्याकडे आहे. तो बाहेर काढला तर अनर्थ होईल, असे राणे म्हणाले.

(Edited by Amol Sutar)

Nitesh Rane
Ashok Chavan Resignation : मोठी बातमी - काँग्रेससोबत किती आमदार? उद्या चित्र स्पष्ट होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com