Vaibhav Naik, Uday Samant Ravindra Chavan, Nilesh Rane And Narayan Rane sarkarnama
कोकण

Nilesh Rane : कोकणातून राणे संपणार? म्हणणाऱ्यांना निलेश राणेंचा खणखणीत उत्तर, भाजप प्रवेशावरही सूचक वक्तव्य; म्हणाले, “रवींद्र चव्हाणांना…”

Nilesh Rane On Uday Samant, Ravindra Chavan And Vaibhav Naik : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा बसला असून आता महानगरपालिकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहत वाहण्यास सुरूवात होणार आहे.

Aslam Shanedivan

  • कोकणात राणे कुटुंबाचे वर्चस्व कमकुवत होत असल्याची चर्चा सुरू असताना निलेश राणेंनी ते ठामपणे नाकारले.

  • उदय सामंत, रविंद्र चव्हाण आणि वैभव नाईक यांच्याकडून वाढणाऱ्या राजकीय टीकेला निलेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

  • “कोकणातून राणे कुटुंब संपणार नाही” असा इशारा देत त्यांनी आपली ताकद अजूनही कायम असल्याचा दावा केला.

Sindhudurg News : राज्यात नुकताच नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अशातच तळकोकणात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत जोरदार राडा केला आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारण प्रभावी झाले आहे. आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. यानंतर आगामी निवडणुकांत होणारी अडचण लक्षात घेत भाजपने दोन पावले मागे येण्याचा निर्णय घेतला आहे. रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा टाकला आहे. यादरम्यान निलेश राणे यांनी एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कोकणातून राणे कुटुंब संपणार? या चर्चेसह राजकारणातून संन्यास घेणार ते भाजपमध्ये प्रवेश करणार या प्रश्नांवर बेधडक उत्तरे दिली आहेत. ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

नुकताच तळकोकणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच निलेश राणे आक्रमक झाल्याचे समोर आले होते. त्यांनी महायुतीसाठी आग्रह धरला असतानाही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने युती होवू शकली नाही, म्हणत आरोप केला होता. त्यानंतर मालवण येथे रविंद्र चव्हाण यांच्या प्रचार सभेनंतर स्ट्रिंग ऑपरेशन करुन पैसे वाटपाचा आरोपही केला होता. ज्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण तापले होते.

यानंतर आता त्यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना कोकणातील राणेंची ताकद संपणार नाही, वाईट काळातही राणे संपले नाही. त्यामुळे राणेंना संपवण्याचे स्वप्नही कोणी बघू नये, असा खणखणीत इशारा दिला आहे. तसेच निलेश राणेंनी आमचे कुटुंब कोकणातून कधीच संपणारे नसून, निवडणुकीत राणेंचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न कोणी प्रयत्न केला मात्र त्यांना ते जमलं नाही असे म्हटलं आहे. त्यामुळे आता त्यांनी आपला रोख कोणाकडे ठेवला आहे असा सवाल उपस्थित केला जातो.

मधल्या काळात राणे बंधूमध्ये जोरदार वाद समोर आला होता. तर रवींद्र चव्हाण यांच्याकडून देखील राणेंना आव्हान देणारे निर्णय घेण्यात आले होते. तसेच आताही आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांनी खासदार नारायण राणेंचं राजकारण संपवलं जात असल्याचा आरोप केला होता. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील, राणे 10 वर्षापूर्वी पराभूत झाले तेव्हा त्यांचे राजकीय कारकीर्द संपलीच होती. पण त्यानी पक्ष बदलले. सत्तेत असलेल्या पक्षासोबत राहिले.

यामुळेच त्यांचे राजकारण टिकले. त्यांची ताकद किती होती आणि आता किती आहे हे भाजपच्या लोकांना माहिती आहे. युती होती म्हणून ते राहिले आहेत. त्यांचं कर्तुत्व काय? राणेंचं स्वत:च अस्तित्व नाही, अशी टीका केली होती. यावरून त्यांनी, राणे आणि त्यांचे कुटुंब काही केलं तरी कोकणातून संपणारे नाही. राणे कुटुंब संपलं अशी हाकाटी पिटली गेली. मात्र काय झाले आम्ही तिघेही निवडून आलो. त्यामुळे राणे साहेबांचे असो किंवा कुटुंबाचे राजकारण कोकणातून संपणार नाही नसल्याचा इशारा दिला आहे.

तसेच त्यांनी निवडणुकीच्या आधी भाजपकडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप करताना पुरावे देत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. उलट त्यांच्यावरच कारवाई झाली होती. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या. तर त्या पद्धतीने ऑफर होती असा खुलासाही निलेश राणेंनी केला होता. यानंतर आता निवडणुकीआधी आपण रविंद्र चव्हाणांना फोन केल्याची माहिती निलेश राणेंनी दिली आहे. तसेच जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असतानाही झिरो समजणाऱ्या भाजपाला निवडणुकीत ताकद दाखवण्यासाठीच अंगावर घेतल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर भाजप प्रवेशावर उत्तर देताना आपण शिवसेना कधीच सोडणार नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना त्यांनी, विंद्र चव्हाणांनी शिवसेनेची जिल्ह्यात ताकदच नाही हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत एक आणि दोन जागांची ऑफर दिली. त्यामुळेच त्यांनी रवींद्र चव्हाणांवर टीका केली. तर आमची ताकद जो कुणी संपवण्याचा प्रयत्न करेल त्याचे प्रयत्न हाणून पाडू असाही इशारा त्यांनी दिला आहे.

रविंद्र चव्हाणांनाच सिंधुदुर्गात युती नको होती, असा आरोप निलेश राणेंनी करताना, दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच त्यांना आपण फोन केला केला होता. मात्र ते कामात व्यस्त असून त्यांना निरोप देतो असे पीएने सांगितले होते. मात्र त्यांचा फोन आलाच नाही. यावरून आता वाद सुरू आहे. पण आता याबाबत आपण हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेळ घेऊन बोलणार असल्याचं निलेश राणेंनी सांगितलंय. या शिवाय रविंद्र चव्हाण यांचीही भेट घेणार असल्याचेही सांगत आपण छोटा कार्यकर्ता असून त्यांना भेटण्यात काहीही वाटणार नाही असेही निलेश राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

FAQs :

1. कोकणात राणे कुटुंबाचे वर्चस्व का कमी होत असल्याची चर्चा आहे?
उदय सामंत, रविंद्र चव्हाण आणि वैभव नाईक यांसारख्या नेत्यांनी आपली ताकद वाढवल्याने अशी चर्चा रंगली.

2. निलेश राणेंनी नेमकं काय विधान केलं?
“राणे कुटुंब कोकणातून काही केलं तरी संपणार नाही” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

3. वैभव नाईक राणेंवर सातत्याने टीका का करत आहेत?
स्थानिक राजकारणातील मतभेद व क्षेत्रीय वर्चस्व यामुळे ही टीका सुरू आहे.

4. उदय सामंत आणि रविंद्र चव्हाण यांच्या वाढत्या प्रभावाचा राणेंवर परिणाम झाला आहे का?
होय, या दोघांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे राणेंच्या पारंपरिक वर्चस्वाला आव्हान निर्माण झाले आहे.

5. राणे कुटुंबाचे भविष्य कोकणात सुरक्षित आहे का?
निलेश राणेंच्या म्हणण्यानुसार त्यांचे राजकीय अस्तित्व मजबूत असून कोणीही ते संपवू शकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT