Kokan News: सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत आणि त्यांच कुटुंब अडचणीत सापडलं आहे. राऊतांसह त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि कट्टर विरोधक राहिलेल्या निलेश राणेंनी विनायक राऊतांना डिवचलं आहे.
कोकणातील कुडाळ येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी निलेश राणे यांनी आपल्या भाषणात माजी खासदार व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांना जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, आयुष्यभर ज्यांनी राणे कुटुंबाचा तिरस्कार केला, त्यांची सातत्यानं बदनामी केली, ते आज स्वतःच्याच कर्मानं 'हिट विकेट' झाले असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
आमदार निलेश राणे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीकेचा आसूड ओढला. त्यांनी नियती कोणालाही माफ करत नाही, म्हणूनच सांगतो की, राणेंशी नेहमी चांगले राहा. गेल्या 20-20 वर्षांपासून काही लोकांनी केवळ राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा, त्यांची समाजात बदनामी करण्याचा आणि त्यांच्या मागे नको त्या यंत्रणा लावण्याचा उद्योग केल्याचा गंभीर आरोपही यावेळी राणेंनी केला.
तसेच एखाद्याबद्दल किती वाईट करायचे, याला काही मर्यादा असते की नाही? पण आज बघा, आम्हाला त्यांच्याविरुद्ध काहीही करावे लागले नाही, तर नियतीनेच त्यांना असा काही धडा शिकवला आहे की, ते स्वतःच आपल्या घरातून 'हिट विकेट' झाल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी सांगितलं.
तसेच निलेश राणे यांनी यावेळी विनायक राऊतांसह त्यांच्या विरोधकांनाही इशाराही दिला. नियती कोणालाही माफ करत नाही. म्हणूनच तुम्हाला सांगतोय, राणेंशी चांगले राहा, असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या राजकारणाचा दाखला दिला. राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाहीत आणि आमच्याकडे असल्या गोष्टींसाठी वेळही नाही, असंही राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सून गिरीजा राऊत यांनी माजी खासदार विनायक राऊतांसह पती आणि कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारूनुसार, माजी खासदार विनायक राऊत, मुलगा गितेश राऊक यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भोंदूबाबा फिरोज शेखला याच्यावर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर आता 23 जुलैला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत विनायक राऊत, गितेश राऊत यांची चौकशी होणार नसल्याचं बोललं जात आहे. तर माजी खासदार विनायक राऊत यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.