Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Chiplun Rane Vs Jadhav : मोठी बातमी ! चिपळूणमधील राजकीय राड्यानंतर 300 ते 400 जणांवर गुन्हा

Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांचे कार्यकर्ते चिपळूणमध्ये आमने-सामने आले होते.

Ganesh Thombare

Ratnagiri Political News: गुहागरमधील दगडफेकप्रकरणी ठाकरे गट आणि भाजपच्या तब्बल 300 ते 400 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुहागर येथील सभेसाठी माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना चिपळूण येथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. (Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav)

या वेळी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. आमदार भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यामुळे चिपळूण शहरात शुक्रवारी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. शुक्रवारी रात्री अखेर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, अशातच कोकणात चांगलंच राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. राणे आणि जाधव यांच्यातला वाद चांगलाच पेटला असून, शुक्रवारी ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले.

सिंधुदुर्गमधील सभेत भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना हिशेब चुकता करणार, असा थेट इशारा दिला होता. यानंतर गुहागर येथील सभेत राणे यांनी जाधव यांच्यावर सडकून टीका केली.

Edited By-Ganesh Thombare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT