Vaibhav Naik : चिपळूणच्या राड्यानंतर कणकवलीतील आमदार वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ; नेमकं काय घडलं?

Narayan Rane Vs Vaibhav Naik : वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पोलिस कडक बंदोबस्त..
Vaibhav Naik
Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg Political News : कोकणात चिपळूण येथे झालेला ठाकरे समर्थक व राणे समर्थक यांच्यात झालेला राडा म्हणजे भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट होता. त्याला भाजपाची साथ असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सभा घेताना गुहागर व चिपळूण येथील कार्यकर्त्यांना घेऊन करायला हवी होती, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे 500 गाड्या गुहागरला गेल्या आहेत. ही सभा जाहीर झाल्यानंतरच निलेश राणे यांना सुरक्षा देण्यात आली होती. अशी दादागिरी शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशाराही देखील नाईक (Vaibhav Naik) यांनी यावेळी दिला.

Vaibhav Naik
Shivajirao Adhalrao Patil : लोकसभेच्या तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटलांकडे नवी जबाबदारी

दरम्यान, निलेश राणे यांच्या गाडीवर चिपळूणमध्ये भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. परिणामी शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्या घटनेनंतर ठाकरे गटाचे पक्षाचे वैभव नाईक यांच्या निवासस्थाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कणकवली पटवर्धन चौक व अन्य ठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप स्वतः पेट्रोलिंग कणकवली शहरात करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भास्कर जाधव यांचा उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना इशारा देत गुहागरमध्येच सभा घेऊ उत्तर देण्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार शुक्रवारी निलेश राणे आणि समर्थकांनी भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोरून रॅली काढली. त्यावेळी जाधवांच्या समर्थकांनी निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक केली. त्यानंतर चिपळूण शहरामध्ये तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली. आता चिपळूण शहरासह कणकवली येथील नाईकांच्या घराभोवती चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Vaibhav Naik
Nashik Lok Sabha Election : भाजप स्वकीय इच्छुकांसह विरोधकांनाही देणार ‘शॉक’! नाशिकमध्ये काय आहे प्लॅन?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com