Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Mahayuti Politics : 'इथे वळवळ, हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम बंद करा, अन्यथा आम्हीच बॉस'; बंडखोर उमेदवाराला नितेश राणेंची भरसभेत धमकी

Nitesh Rane Warns Rebel BJP Candidate in ZP Elections: नुकताच मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी प्रचार सभेत ठाकरेंच्या उमेदवारांना निधी देणार नाही म्हणत फक्त महायुतीचेच उमेदवार निवडून द्या असे वक्तव्य केलं होतं.

Aslam Shanedivan

  • वेंगुर्ले तालुक्यातील परुळे पंचायत समिती निवडणुकीत भाजप बंडखोरीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

  • नितेश राणेंनी थेट मतदारसंघात जाऊन कॉर्नर सभा घेत बंडखोर उमेदवाराला इशारा दिला.

  • नारायण राणेंचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत पक्षशिस्त पाळण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

Sindhudurg ZP Elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचेच सगळेच उमेदवार जिंकले पाहिजेत. पालकमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या माझ्या ताब्यात आहेत. विकासाचा निधी मीच देणार आहे. त्यामुळे निधीसाठी कमळ आणि धनुष्यबाणालाच निवडून द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कदाचित निवडून आलाच तर दिलेला निधी कापणार, फक्त कापणार नाही तर तो परत घेणार, असे वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानाने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असतानाच आता त्यांनी थेट उमेदवाराला धमकी देणारेच विधान केलं आहे.

त्यांनी, कुठलीही मस्ती करू नका. आमच्याकडे परत परत समजविण्याचे प्रकार होत नाहीत. आम्हीच बॉस, त्यामुळे बॉस इज ऑलवेज राईट हे समजून काम करा, अशा शब्दात नितेश राणे यांनी बंडखोर उमेदवाराला दम भरला आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे थंड पडलेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. तळकोकणातही मंत्री नितेश राणे स्वतः मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहेत. तर महायुतीचेच उमेदवार कसे निवडूनव येतील याची रणनीती आखताना दिसत आहे. दरम्यान त्यांनी, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे पंचायत समिती मतदार संघात कॉर्नर सभा घेत धमकी दिल्याचे समोर आले आहे.

परुळे पंचायत समितीची जागा ही महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला गेली आहे. पण येथे भाजप मधून बंडखोरी झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. एकाआर्थी मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणेंच्या शब्दालाच आव्हान निर्माण केले आहे. यावरून संतापलेल्या नितेश राणेंनी येथे कॉर्नर सभा घेत अपक्ष उमेदवाराला धमकी वजा इशारा दिला आहे. त्यांनी, ज्या निवडणुकीचे नेतृत्व नारायण राणे करतात तेथे संभ्रम नसतो. राणेंनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो.

पण आता इथे इथे वळवळ आणि हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. जो थांबला पाहिजे. राणेंचा शब्द न मानणारा कोणी असेल तर त्याने ती हिंमत करू नये. याच्याआधी देखील बंडखोर निलेश सामंत यांना समज दिली असून ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेल्याचे सांगितले आहे. तसेच कुठलीही मस्ती करू नका, असे सांगितले असून आमच्याकडे परत परत समजविण्याचे प्रकार होत नाहीत. यामुळे वळवळ आणि हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम योग्य वेळी बंद झाला नाही, तर 9 फेब्रुवारीनंतर 10 फेब्रुवारी उजाडेल, हे काही लोकांनी लक्षात ठेवाव. येथे आम्हीच बॉस असून बॉस इज ऑलवेज राईट असतो हे कोणी विसरू नये अशा शब्दात धमकी वजा इशारा दिला आहे.

आमचे वडील प्रिन्सिपल

तसेच आम्हाला कोणी हलक्यात घेत सुक्या धमक्या देऊ नयेत. तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात त्यांचे प्रिन्सिपल आमचे वडील आहेत, हे ही कोणी विसरू नये. निवडणुकीत वळवळ करून संभ्रम निर्माण करत गालबोट लावण्याचे प्रकार थांबवावेत, पुन्हा संधी नाही. राणेंचा शब्द तोडणाऱ्याना आणि अपमान करणाऱ्याला मुभा नाही. तर जर कोणी असे करत असेल तर जी ओळख मिळाली आहे ती फक्त राणेंचा कार्यकर्ता म्हणून मिळाली आहे, हे ही कोणी विसरू नये, असेही त्यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. परुळे पंचायत समितीत नेमका वाद कशावरून आहे?
भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

2. नितेश राणेंनी काय इशारा दिला?
आम्हीच बॉस असून निर्णय अंतिम आहे, असे स्पष्ट करत अप्रत्यक्ष धमकी दिली.

3. ही सभा कुठे झाली?
वेंगुर्ले तालुक्यातील परुळे भागात कॉर्नर सभा घेण्यात आली.

4. या निवडणुकीचे नेतृत्व कोण करत आहे?
या निवडणुकीचे नेतृत्व नारायण राणे करत आहेत.

5. या वादाचा निवडणूक निकालावर परिणाम होईल का?
पक्षशिस्तीचा मुद्दा तीव्र झाल्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT