Mahayuti Politics : जिपसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, उद्धव ठाकरेंवर घणाघात तर अजितदादांच्या राष्ट्रवादीबद्दल राणेंची मोठी घोषणा

Narayan Rane On Zilla Parishad and Panchayat Samiti elections and Uddhav Thackeray : राज्यात नुकताच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले आहे. यानंतर आता राज्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी केली जातेय.
Narayan Rane And Uddhav Thackeray
Narayan Rane And Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on
Summary
  • नारायण राणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.

  • भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटप निश्चित असून महायुतीला 100% यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत “विरोधकांसाठी जागाच शिल्लक ठेवली नाही” असे वक्तव्य नारायण राणेंनी केले.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून जिल्ह्यात महायुतीची घोषणा खासदार राणे यांनी केली होती. जिल्हा परिषदेच्या ५० तर आठ पंचायत समित्यांच्या मिळून १०० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तर 'विरोधकांसाठी आम्ही जागाच शिल्लक ठेवली नाही' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय. तसेच महाराष्ट्रात 25 ठिकाणी भाजपची सत्ता आली असून आता तरी उद्धव ठाकरे यांनी घरी बसावे, असा सल्ला देताना ते आता डिप्रेशनमध्ये गेलेत अशी बोचरी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा झाली असून महायुतीची सुत्रे पुन्हा एकदा खासदार नारायण राणे यांच्याकडे गेली आहे. यानंतर खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत जागा वाटपांच्या फॉर्मुल्याची माहिती दिली आहे.

यावेळी त्यांनी, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढेल असे सांगताना युतीची घोषणा केली. भाजप जिल्हा परिषदमध्ये 31 तर पंचायत समितीमध्ये 63 जागा, शिवसेना जिल्हा परिषदेत 19 तर पंचायत समितीत 37 जागा लढणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या ते बसून ठरवू, असे म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी महायुतीला या निवडणुकीतही 100 टक्के यश मिळेल. महानगरपालिकेचा निकाल लागला तसाच निकाल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत लागेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Narayan Rane And Uddhav Thackeray
Narayan Rane : नारायण राणेंनी डाव टाकला, भाजप जिल्हाध्यक्षाला ठणकावतं केली महायुतीची घोषणा

वाद करायला महाराष्ट्रात विरोधक शिल्लक राहिलेले नसून आज संध्याकाळपर्यंत आमचे उमेदवार निश्चित होतील, ते सोमवारी (ता.१८) उमेदवारी अर्ज दाखल करतील, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी, मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. पण त्यांची सत्ता का आली ना याचे कारण उद्वव ठाकरे यांना विचारा. दोन्ही भाऊ एकत्र येऊनही ते काहीच करु शकले नाहीत, असेही म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचले आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना, ठाकरेंना वाटतं की आपला महापौर झाला पाहिजे, देवाच्या मनात असेल तर तो शिवसेनेचाच होईल. मात्र आता प्रश्न पडतो तो उद्धव ठाकरे देवावर कधीपासून विसंबून राहायला लागले. आतापर्यंत त्यांनी कधी देवाकडे हात जोडले नाहीत. मग आता काय महापौर आकाशातून येईल का? त्यांची संख्या बघता एवढा फरक कसा भरुन निघणार आहे? असाही सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

तर उद्धव ठाकरे हे या पराभवामुळे डिप्रेशनमध्ये गेले असून ते जे बोलत आहेत, ती वास्तव परिस्थिती नाही. महाराष्ट्रात 25 ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आता तरी उद्धव ठाकरे यांनी घरी बसावे असा खोचक सल्ला नारायण राणे यांनी लगावला आहे.

Narayan Rane And Uddhav Thackeray
Narayan Rane : भाषणात आवाज अडकला, तो सावरला, रेटला; पण पुढच्या क्षणाला भाजपचा दिग्गज स्टार प्रचारकाला गरगरलं..!

FAQs :

1. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कोण लढणार?
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुती म्हणून निवडणुका लढणार आहेत.

2. भाजप किती जागा लढवणार आहे?
भाजप जिल्हा परिषदेत 31 तर पंचायत समितीत 63 जागा लढवणार आहे.

3. शिवसेनेला किती जागा देण्यात आल्या आहेत?
शिवसेना जिल्हा परिषदेत 19 आणि पंचायत समितीत 37 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

4. अजित पवार गटाला किती जागा मिळणार आहेत?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या हे लवकरच चर्चेतून ठरवले जाणार आहे.

5. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर काय टीका केली?
“25 ठिकाणी भाजपची सत्ता आली असून उद्धव ठाकरे यांनी आता घरी बसावे” अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com