Nitesh Rane
Nitesh Rane 

Sarkarnama 

कोकण

नितेश राणेंचा पुन्हा इशारा... व्याजासकट परतफेड करू!

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपला शिवसेना आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधातील आक्रमकपणा कायम ठेवला आहे. राणेंवर हल्ला झाला तर आम्ही व्याजासकट परत देतो, असा इशारा राणे यांनी आज पुन्हा दिला.

म्याॅंव, म्याॅंव आवाज, मलिक यांच्याविरोधात ट्विटरवाॅर, असे अनेक प्रकार गेल्या दोन दिवसांत घडले. त्यानंतर आज कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना राणे यांनी आज पुन्हा जशास तसे उत्तर देण्याचा इरादा व्यक्त केला.

राणेंवर हल्ला झाला तर आम्ही व्याजासकट परत देतो. कोणाला हात घालता आहेत, याचा नवाब मलिक यांनी विचार करावा. अजून माहिती हवी असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीकडून घ्यावी. राणेंच्या नादाला लागलात तर हर्बल तंबाखू पण कामाला येणार नाही, असे राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या प्रचारात शिवसैनिकांवर हल्ला झाला. त्याबद्दल पोलिसांनी आज नितेश राणे यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा हल्ला म्हणजे सेना खासदार विनायक राऊत यांच्या दोन समर्थकांच्या गटातील वाद असल्याचा दावा त्यांनी केला.

यानिमित्ताने त्यांनी राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, ``विनायक राऊत जर आम्हाला संस्कृती शिकवायला लागले तर यापेक्षा दुसरा विनोद नाही. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून वेगवेगळ्या घोषणा देण्याचा आम्हाला अधिकार आहे. विनायक राऊत, उदय सामंत यांनी संस्कृतीची भाषा करणे किंवा हे किती सुसंस्कृत आहेत याची माहिती घ्यायची असेल तर त्यांच्या घरच्या लोकांना विचारा. विनायक राऊत यांच्याकडे संतोष परब प्रकरणातील जी माहिती आहे ती मिडियाकडे देण्यापेक्षा पोलिसांकडे द्यावी. संतोष परब यांच्यावर हल्ला विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्या वादातून झाला आहे.राऊतांनी आपसातले हे वाद मिटवावेत कारण कार्यकर्त्यांचा नाहक बळी जात आहे.``

महाराष्ट्राच्या राजकारणात किती जणांची टिंगल केली जाते? किती जणांचे आवाज काढले जातात? यांनी काढले तर ठाकरी भाषा. बाळासाहेब ठाकरेपर्यंत ठीक होते. त्यांना आवाज काढण्याचा, आम्हाला शिव्या देण्याचा त्यांना अधिकार होता. पण बाकीच्या लोकांना नाही आहे.आता ते दिवस गेले. बाळासाहेब असताना त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, सगळे हसून स्वीकारायचे. बाकीच्या उरलेल्यांनी ती हिंमत करू नये. त्या लोकांनी हिंमत केली तर आमचं म्याव म्याव तयार आहे,`` असाही इशारा त्यांनी दिला.

परब हल्ला प्रकरणी राणेंची दोनदा चौकशी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जिवघेणा हल्ला झाला होता. त्या संदर्भात कणकवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारी रून कणकवली पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर रहाण्याचे समन्स बजावलं होतं. त्यानंतर आता भाजप आमदार नीतेश राणे यांना कणकवली पोलिस स्टेशन मध्ये दोन वेळा हजेरी लावली लागली. त्यानंतर आज पुन्हा नितेश राणे यांनी कणकवली पोलिसांनी बोलवून घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT