नितेश राणे फडणविसांच्या मागे बसले आणि परबांचे पित्त खवळले..

विधानसभेत नितेश राणेंनी (Nitesh Rane) आपली जागा सोडल्याने परब (Anil Parab) यांनी निदर्शनास आणून दिले..
Nitesh Rane- Anil Parab

Nitesh Rane- Anil Parab

Nitesh Rane-Anil Parab

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब (Anil Parab) विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंब यांच्यातील युद्ध नवीन नाही. राणे यांना अटक करण्यात परब यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे राणे यांचे पुत्र नितेश आणि निलेश हो दोघेह परब यांच्याशी सोशल मिडियावर वाद घालत असतात. पण हा वाद केवळ सोशल मिडियापुरता मर्यादित न राहता त्याचे पडसाद सभागृहातही उमटले.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane- Anil Parab</p></div>
चारवेळा बोलावूनही फडणवीस आले नाहीत; पोलिसांची न्यायालयात माहिती

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभागृहात नक्कल करून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेत्यांना डिवचले. त्यानंतर या वादाचे पडसाद गेले चार दिवस अधिवेनशात उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सलग चार दिवस सरकारविरोधाची भूमिका आक्रमकपणे बजावली. दर अधिवेशनात त्यांच्या मागे संजय कुटे, आशिष शेलार, गिरीष महाजन अशी ज्येष्ठ मंडळी बसत होती. मात्र या आमदारांचे निलंबन झाले असल्याने सध्या पाठिमागे रणजित सावरकर, कालिदास कोलंबकर हे पाठिमागच्या आसानांवर बसले. मात्र एक दिवस नितेश राणे हे पूर्ण दिवस फडणवीस यांच्या मागे बसून होते.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane- Anil Parab</p></div>
मोदींची नक्कल होताच फडणवीस 'तडफनीस' झाले ; रुपाली पाटलांचा टोला

सभागृहात ज्येष्ठतेनुसार बसण्याची व्यवस्था केली जाते. मात्र राणे हे पुढे बसले होते. प्रश्नोत्तरांच्या तासात परिवहनमंत्री अनिल परब हे उत्तरे देत असताना राणे यांनी त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर परब चिडले आणि सभापतींची परवानगी न घेताच प्रश्न विचारत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. तसेच राण हे स्वतःचे आसन सोडून पुढे बसले आहेत. आधी त्यांना त्यांच्या आसनावर बसायला सांगा, असे तो ओरडून अध्यक्षांना सांगू लागले. व्यवसायाने वकिल असलेल्या परब हे वरच्या स्वरात किंवा आक्रमक बोलत नाहीत. पण त्यांचा आवाज इतका वाढला की नितेश राणे हे नंतर त्यांच्या स्वतःच्या आसनावर जाऊन बसले.

शेवटी फडणवीस यांनाच मध्यस्थी करावी लागली. राणे यांचा सीट नंबर 96 आहे. ते आपल्या सीटवर बसतील, असे सांगून हा विषय थांबला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com