Raj Thackeray sarkarnama
कोकण

Palghar MNS Violence : मनसे माजी शहर प्रमुखासह तालुका प्रमुखाला बेदम मारहाण; पालघरबाबत राज ठाकरेंचा मोठा निर्णय, राजू पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी

Raj Thackeray Palghar MNS Internal Dispute : पालघरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून बाहेर आली होती. यावेळी मनसे कार्यालयात आयोजित बैठकीतच माजी शहर प्रमुखासह तालुकाध्यक्षावरही हल्ला करण्यात आला होता.

Aslam Shanedivan

Palghar News : पालघरमधील पक्षात झालेल्या वादातून हाणामारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कडक पावले उचलली आहेत. पक्षातील गृहकलहावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांना पालघरचा दौरा करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्याप्रमाणे त्यांनी पालघरचा दौरा करत कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. तर पदाधिकाऱ्यांमधील मारहाणीच्या घटनेचा सविस्तर अहवाल ते पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सादर करणार आहेत. यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पक्षातील धुसफूस थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालघरमध्ये मनसे कार्यालयात नुकतेच दोन गट आमनेसामने आले होते. नियोजित बैठकीदरम्यानच दोन्ही गट भिडल्याने येथे जोरदार हाणामारी झाली होती. तर या घटनेत मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत आणि तालुकाध्यक्ष संदीप किणी यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेत राऊत गंभीर जखमी झाले होते. तर त्यांच्यावर पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.

या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि वाद चव्हाट्यावर आला होता. तसेच येथील राजकीय वाद अधिकच तीव्र झाला होता. आता या वादाची पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून या वादासह अंतर्गत गृहकलहावर तोडगा काढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता कडक पावले उचलली आहेत. त्यांनी याची जबाबदारी मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांच्यावर सोपवली होती.

त्याप्रमाणे राजू पाटील पालघरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्ष पुन्हा संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. तसेच पक्षातील सदस्य नोंदणी कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. याच वेळी त्यांनी पालघरमधील पदाधिकाऱ्यांमधील मारहाणीच्या घटनेचा सविस्तर अहवाल राज ठाकरे यांना सादर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT