Raj Thackeray Meets Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ठाकरे थेट CM फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

Raj Thackeray meets Devendra Fadnavis at Varsha : बुधवारी सकाळी ठाकरेंचा ताफा अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचला. या भेटीची माहिती समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Raj Thackeray Meets Fadnavis | Maharashtra Politics
Raj Thackeray Meets Fadnavis | Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 12 Aug : महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी (ता.12) एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरेंची ही अचानक भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

बुधवारी सकाळी राज ठाकरेंचा ताफा अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचला. या भेटीची माहिती समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर आक्रमकपणे टीका करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधला होता. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरूनही त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते.

Raj Thackeray Meets Fadnavis | Maharashtra Politics
Lad Vs Hake : आमदारकीसाठी शिंदेंच्या घरासमोर 2-2 तास बसणारे ओबीसींचं काय हित साधणार? : प्रसाद लाडांचा हाकेंवर हल्लाबोल

मात्र, सरकारवर सातत्याने टीका करणारे राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचल्याने या भेटीचे राजकीय महत्त्व वाढले आहे. आगामी राजकीय घडामोडी, राज्यातील विविध प्रश्न किंवा इतर कोणत्या महत्त्वाच्या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली का, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Raj Thackeray Meets Fadnavis | Maharashtra Politics
Ghatkopar Landslide : मुंबईत मोठी दुर्घटना! घाटकोपरमधील चाळीवर दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील या भेटीमागचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ठाकरेंनी सकाळी अचानक वर्षा बंगला गाठल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com