Nalasopara Gym Trainer Arrest Sarkarnama
कोकण

Nalasopara Gym Trainer Arrest : 70 ते 80 युवतींना फसवल्याचा दावा; इन्स्टाग्रामवर ओळख, नालासोपारा जिम ट्रेनरला पोलिसांकडून अटक

Nalasopara police arrest 22-year-old gym trainer after woman alleges sexual assault and claims that 70 to 80 women were deceived. The investigation underway : तक्रारदार तरुणीचा गंभीर आरोप; अश्लील चित्रफिती तयार केल्याचा दावाही तक्रारीत, प्रकरणाचा तपास सुरू.

Pradeep Pendhare

Palghar police arrest gym trainer Instagram case : युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पोलिसांनी जिम प्रशिक्षक आरिफ शेख (वय 22) याला अटक केली.

लग्नाचे प्रलोभन दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार एका 23 वर्षीय युवतीने केली आहे. आरोपीने अनेक युवतींना फसवून त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्याचा आरोप तिने केला आहे. आतापर्यंत 70 ते 80 तरुणींची फसविल्याचा दावाही तिने केला आहे.

पीडित युवतीची मागीलवर्षी आरिफ शेख याच्याशी ओळख झाली होती. आरिफ हा इन्स्टाग्राम (Social Media) इन्फ्लुएन्सर असून, जिम प्रशिक्षक म्हणूनही काम करतो. तक्रारीनुसार आरोपीने लग्नाचे प्रलोभन दाखवून युवतीला स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्याशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या काळात आरिफ आणि त्याच्या आईने युवतीवर धर्मांतरासाठी दबाव टाकला. तसेच तिला मारहाण केल्याचाही आरोप आहे. आरोपीचा मावसभाऊ सोहेल यानेही तिच्याशी बळजबरी (Crime) करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरिफ शेख, त्याची आई रुक्साना आणि मावसभाऊ साहिल शेख यांच्याविरोधात बलात्कार, बळजबरीने डांबून ठेवणे आणि मारहाण आदी आरोपांखाली सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेला आरिफच्या मोबाइलमध्ये अनेक तरुणींसोबतचे वादग्रस्त व्हिडिओ आढळल्याचा दावा तिने केला आहे. यानंतर तिने स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. आरोपी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून युवतींना लक्ष्य करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे आणि त्यानंतर त्यांच्या अश्लील चित्रफिती अश्लील संकेतस्थळांवर विकत असे, असा आरोपही केला आहे.

दरम्यान, व्हिडिओच्या आधारे सकल हिंदू संघटनेचे शिव उपाध्याय यांच्या तक्रारीवरून आरिफविरोधात धार्मिक भावना भडकवणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT