raj thackeray sarkarnama
कोकण

Raj Thackeray Live Panvel : आता `मनसे`चे अमराठी पदाधिकारी पक्षाला अमराठींची साथ आणि मत मिळवून देणार ?

सरकारनामा ब्यूरो

Panvel : तेरा वर्षे रखडलल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून `मनसे`ने बुधवारी (ता.१६) पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला. मराठी माणसाची संघटना म्हणून ओळख असलेल्या `मनसे`चा कोकणातील एक तालुकाध्यक्ष शीख तथा पंजाबी बांधव आहे. त्याचा खास उल्लेख या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करताच त्याची मोठी चर्चा झाली.

मनसेने आपली कक्षा हिंदुत्वापर्यंत रुंदावली. त्यातून या पक्षाला आता काही अमराठी पदाधिकारी मिळाले आहेत.त्यात कोकणातील मंडणगडचा तालुकाध्यक्ष हा शीख तथा सरदार आहे. नवज्योतसिंग गौड असे त्यांचे नाव असून तेच नाही,तर त्यांचे कुटुंब मराठीतच बोलते. त्यामुळे ते मराठीच वाटतात. पक्षात अनेक अनेक अमराठी असल्याचं सांगत राज यांनी गौड यांचा खास उल्लेख पनवेलच्या मेळाव्यात केला. गौड व त्यांचे कुटुंब पूर्णपणे मराठीत बोलत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतूकही केले.

मराठी माणसांसाठी लढणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहेच,असे स्पष्ट करीत मराठी बोलणाऱ्या अमराठी नागरिकांना सुद्धा घेऊन काम केलं पाहिजे असं राज पनवेलमध्ये म्हणाले. त्यातून त्यांची हिंदुत्वाची भुमिका अधोरेखित झाली. महाराष्ट्रात गेल्या कित्येक पिढ्या राहणारे मारवाडी,गुजराती, तमिळी, पंजाबी असे अमराठी `मनसे `त असल्याचा उल्लेख अभिमानाने त्यांनी यावेळी केला. सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा आणि मराठी जनतेचा विचार केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गौड हे मूळचे पंजाबचे असले,तरी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे वडील महाराष्ट्रात राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्वांना मराठी भाषा येते. राज यांनी मागील महिन्यात मंडणगडला सभा घेतली.त्यावेळीही त्यांनी गौड यांचा खास गौरव केला होता.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT