Panvel : शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यभर गाजलेल्या ‘खोक्या’त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा हात घातला आणि त्याच हाताने राज यांनी लांबून-लांबून का होईना (अप्रत्यक्षपणे) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घाव घातला. खोके-खोके ओरडणाऱ्यांकडे ‘कंटेनर’ असल्याचे सांगून राज यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह ठाकरेंच्या ४० आणि काही अपक्ष आमदारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावर प्रत्येकी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करीत, आघाडीच्या नेत्यांनी शिंदेंना नाकीनऊ आणले होते. बंडखोरांवरील ही आरोपाची घोषणा सर्वत्र परसली आणि त्यावरून फुटीर आमदारांना "टार्गेट" गेले. त्यावरून ठाकरे-शिंदे यांच्यातील संघर्षालाही आणखीच धार आली होती.
आजघडीला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे खोक्यांचा मुद्दा उचलून धरतात. त्यात राज यांनी जोरदार ‘एन्ट्री’ करीत, खोक्यांचा आरोप करणाऱ्यांकडे कंटेनर (अर्थात, पैशांचे कंटेनर) असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. राज यांचा हा आरोप ठाकरेंच्या जिव्हारी लागणार हे, निश्चित आहे. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच, राज यांच्या कंटेनरवरून नवे राजकारण घडू शकते. त्यामुळे दोन्ही ठाकरेंमध्ये यावरून जुंपणार हे आता स्पष्ट आहे.
खड्ड्यातून जातात तरीही तुम्ही त्याच लोकांना मतदान का करतात, लोकप्रतिनिधींना धडा शिकवावा, असे वाटत नाही का ? त्याच त्याच लोकांना तुम्ही मतदान का करतात ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला केला.
पनवेलमध्ये मनसेने खड्डयाच्या विरोधात आंदोलन केले. त्यावेळी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. दरडी कोसळतात, त्यात माणसांचा मृत्यू होत आहे, या घटनांकडे सरकारचे दुर्लक्ष करीत आहे. अनेक 'सरकार' गेलीत तरीही रस्ते तसेच आहेत. समृद्धी महामार्ग चार वर्षात होतो, मग अन्य रस्ते बांधायला पंधरा वर्ष का लागतात, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.