Nitesh Rane Investigated by Sindhudurg Police sarkarnama
कोकण

आमदार नितेश राणे पहिल्यांदाच पोलिसांसमोर हजर; पाऊण तास कसून चौकशी

जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्यकर्ते परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

सरकारनामा ब्यूरो

कणकवली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज (ता. २४) दुपारी कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस (Police) स्टेशनमध्ये त्यांची सुमारे पाऊण तास चौकशी करण्यात आली. या चौकशीबाबत माहिती देण्यास पोलिस प्रशासनाकडून नकार देण्यात आला. राणे यांच्यासोबत त्यांचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई देखील उपस्थित होते. (Nitesh Rane Investigated by Sindhudurg Police)

जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्यकर्ते परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले होते. तर आमदार राणे यांचेही नाव आरोपपत्रात होते. त्यामुळे राणे यांची अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तेथे जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही राणे यांचा जामीन फेटाळला; मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली.(Nitesh Rane News)

राज्य सरकारनेही 27 जानेवारीपर्यंत आमदार राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी उच्च न्यायालयाला दिली होती. या दरम्यान आमदार राणे हे आज अचानक कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाले. राणे हे कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलीसांकडून त्यांची सुमारे पाऊण तास चौकशी करण्यात आली; मात्र, या चौकशीचा तपशील देण्यास पोलिस प्रशासनाकडून नकार देण्यात आला.

दरम्यान, सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून ते नॉट रिचेबल होते. मात्र, राणे थेट सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत प्रगटले होते. यावेळी त्यांनी नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसोबत विजयाचे सेलिब्रेशन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT