Ratnagiri Incident Sarkarnama
कोकण

Ratnagiri Incident : थरारक प्रसंग! चिमुकलीला वाचवण्यासाठी पोलिस कर्मचारी पळत सुटला; नेमकं काय घडलं?

Policeman Saves Girl In Ratnagiri Khed Bailgada Sharyat : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती बैलगाडा शर्यत...

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Khed Latest News :

बैलगाडी स्पर्धा हा विषय अनेकदा सुरक्षेसाठी वादाचा ठरला आहे. अशाच बैलगाडी स्पर्धा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात भरवण्यात आल्या होत्या. हेदली येथे या बैलगाडी स्पर्धा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने भरवल्या होत्या. मात्र बैलगाडा उधळल्याने एका मुलीचा जीव पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे वाचला आहे. या घटने चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.

खेड Police ठाण्यातील संपत गीते या कर्मचाऱ्याने चिमुकलीचा जीव वाचवला आहे. खेड तालुक्यातील हेदली येथे बैलगाडी स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित करण्यात आली होती बैलगाडी सपर्धा सुरू असताना तिसऱ्या राऊंडला बैल अचानक उधळून प्रेक्षकांच्या गॅलरीत घुसल्याने हा सगळा मोठा अनर्थ घडला. त्यामुळे या सगळ्या प्रकाराने पुन्हा एकदा बैलगाडी स्पर्धांमधील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.

खेड तालुक्यातील हेदली गावात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोकण केसरी बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या स्पर्धेत बैलगाडी हातातून सुटला आणि प्रेक्षकां मध्ये उभे असलेल्या पाच वर्षाच्या लहान मुलीच्या अंगावर गेल्याने ती जखमी झाली यावेळी एका पोलिसाने तिला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल ला घेऊन गेला मात्र सदरच्या बैलगाडी स्पर्धेत त्या मुलीसह पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे बैलगाडी स्पर्धेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बैलगाडा शर्यतीत बैल उधळल्यामुळे प्रेक्षक गॅलरीत शिरला, प्रेक्षकांमधील एका लहान चिमुरडीसह चार जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हेदली या गावात आयोजित स्पर्धेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत लहान मुली सह 4 जण जखमी झाले. अशा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून 5 जखमी झाले आहेत.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अचानक बैल प्रेक्षक गॅलरीत शिरल्याने एकाच गोंधळ उडाला होता. दरम्यान या या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली आहे. खेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी जखमी झालेल्या संदर्भातील नोंद करण्याचे आदेश दिले आहे. या सगळ्या घटनेची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश खेडच्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT