Maratha Reservation :'शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेंनी फसवले', मराठा आरक्षणासाठी...

Shiv Sena : आरक्षण देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि सरकारची आहे. ते त्याच्यापासून पळू काढू शकत नाहीत.
Vaibhav Naik , Eknath Shinde
Vaibhav Naik , Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. 26 जानेवारीपासून त्यांचे मुंबईत आंदोलन सुरू होईल. मात्र, सरकारकडून या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या शपथेची आठवण ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी शिंदेंना करून दिली आहे.

Vaibhav Naik , Eknath Shinde
Ranajagjitsinha patil Vs Omprakash Rajenimbalkar : अर्धवटराव, पावशेरसिंह; आमदार पाटील-खासदार राजेनिंबाळकर भिडले

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे-पाटील यांना फसवले. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील (manoj jarange patil) यांना मुंबईच्या दिशेने कूच करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मराठा आरक्षणाबाबतची शपथ खोटी ठरते काय, अशी शंकाही आमच्या मनात आता निर्माण होऊ लागली आहे, असे वैभव नाईक म्हणाले आहेत. आरक्षण देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि सरकारची आहे. ते त्याच्यापासून पळू काढू शकत नाहीत, असा टोला ही नाईक यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असीम सरोदे यांनी मांडली. या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये वाढू लागली आहे. याचा पार्श्वभूमीवर ईडीच्या, एसीबीच्या कारवाया करण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला. तसेच सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करण्यात आली आहे. आम्ही या कारवाईला भीक घालत नाही, असे देखील ठणकावून सांगितले.

महाराष्ट्र विरुद्ध गुजरात लढाई

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या निर्णयावरून लक्ष विचलित व्हावे, या हेतूने आमदार राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांच्यावर द्वेषापोटी कारवाई करण्यात आली आहे. ही लढाई आता महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. ही लढाई उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीही राहिलेली नाही. ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी झाली आहे, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

(Edited By Roshan More)

Vaibhav Naik , Eknath Shinde
Ravindra Chavan : भाजपला पुन्हा अटलजींची आठवण, जोडले डोंबिवली कनेक्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com