सावंतवाडी नगराध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद चिघळले आहेत.
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी हे पद शिवसेनेला द्यावे अशी मागणी केली आहे.
भाजप नेत्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनी मात्र स्वतःला पुन्हा इच्छूक असल्याचे स्पष्ट केले असून निर्णय रवींद्र चव्हाण आणि नितेश राणेंकडे गेला आहे.
Sawantwadi News : तळकोकणातील राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच तापण्यास सुरूवात झाले आहे. येथे सावंतवाडी नगरपालिकेवर सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असून आपलाच नगराध्यक्ष व्हावा यासाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत रस्सी खेच सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार दीपक केसरक यांनी दावा केला होता. तोच आता भाजपकडून याला खो घालण्याचे काम सुरू झाले आहे. नगराध्यक्ष पद भाजपला मिळावे अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी ही जागा भाजपला मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंकडे केली आहे.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही आता वेग आला आहे. जिल्हापरिषद, पंचायत समिती पाठोपाठ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. या जाहीर झालेल्या आरक्षणात सावंतवाडी नगरपालिकेवर महिलाराज राहणार आहे. यामुळे आता राजकीय पक्षांसह इच्छुकांनी मोर्चे बांधणीला वेग दिली आहे. मात्र अद्याप स्थानिकबाबत महायुतीत जागा वाटपाचा कोणताच फॉर्म्युला ठरलेला नाही. पण त्याआधी नगराध्यक्ष पदावरून महायुतीत ठिणगी पडताना दिसत आहे.
सावंतवाडी नगरपालिकेवर सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर होताच नगराध्यक्ष पदावर केसरकर यांनी दावा केला. त्यांनी, आमचा नगराध्यक्ष असावा, अशी आमची भूमिका असल्याचे सांगत महायुतीच्या बैठकीत हा विषय मांडणार असल्याचे सांगितले होते. तसेच महायुतीने हे पद शिंदे शिवसेनेला सोडावे, अशी मागणीही केली होती.
आता या मागणीला आठवडाही होत नाही तोच भाजपच्या नेत्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्ष पद भाजपला मिळावे अशी लेखी मागणी रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंकडे केली मागणी आहे. अन्नपूर्णा कोरगावकर या सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा असून त्या यंदाही इच्छुक आहेत. त्यामुळेच नुकताच त्यांनी मुंबई येथे पालकमंत्री नीतेश राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत संधी देण्याची मागणी केली.
नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षीत झाल्याने शिवसेनेपाठपाठ आता भाजप पक्षातूनही नगराध्यक्ष पदासाठी दावा करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष व पाच वर्षे उपनगराध्यक्ष पदी राहणाऱ्या सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनीही नगराध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक असून पक्षाकडून पुन्हा संघी मिळावी अशी मागणी केली आहे. मुंबई येथे त्यांनी पालकमंत्री नीतेश राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत नगराध्यक्ष पदासाठी आपणास संधी मिळावी, अशी लेखी मागणी केली आहे.
कोरगावकर या सन 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. तर भाजप पक्षाकडून त्यावेळी फक्त आनंद नेवगी हे एकमेव उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भाजप पक्षात प्रवेश करत पाच वर्षे उपनगराध्यक्ष पद पदरात पाडून घेतले होते. तर दोन महिने शहराचा कारभार सावंतवाडी नगराध्यक्ष म्हणून हाकला होता.
सध्या कोरगावकर या भाजपमध्ये सक्रिय असून आता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्ग असे आरक्षित झाल्याने त्यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगत आधीच पक्ष नेतृत्वाला गळ घातली आहे. तर यापूर्वीचे शिवसेनेनं नगराध्यक्ष पद आपल्याला मिळावे अशा अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिवसेनेकडून माजी उपनगराध्यक्षा आनारोजीन लोवो, सौ. संजना परव, माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर, माजी नगरसेविका भारती मोरे या संभाव्य उमेदवार आहेत. तर सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून तीन नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहेत. ज्यात अनारोजीन लोबो, संजना परब आणि साक्षी कुडतरकर यांची नावे शर्यतीत आहेत. मात्र याबाबत युतीत अद्याप कोणतीही चर्चा अथवा एकमत झालेले नाही. शिवसेनेसह आता भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने ते कोणाला मिळते याचे उत्तर अद्याप सांगला येत नाही.
प्र.1: सावंतवाडी नगराध्यक्षपदावरून कोणत्या पक्षांमध्ये वाद सुरू आहे?
👉 भाजप आणि शिवसेना या महायुतीतील दोन पक्षांमध्ये मतभेद उफाळले आहेत.
प्र.2: दीपक केसरकर यांनी काय मागणी केली आहे?
👉 त्यांनी नगराध्यक्षपद शिवसेनेला द्यावे अशी मागणी केली आहे.
प्र.3: अन्नपूर्णा कोरगावकर कोण आहेत?
👉 त्या भाजप नेत्या आणि सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षा आहेत.
प्र.4: हा वाद कोण सोडवणार आहे?
👉 प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निर्णयाची जबाबदारी आहे.
प्र.5: महायुतीत याचा काय परिणाम होऊ शकतो?
👉 या वादामुळे स्थानिक पातळीवरील महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.