Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

BJP Politics : भाजप निष्ठावंतांना धक्का, 'इन्कमिंग 'वाल्यांना लॉटरी! वरिष्ठांनी फडणवीसांसमोर मांडलेल्या भूमिकेने कोंडी

Devendra Fadnavis Pune Municipal Elections : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत भाजपमध्ये संभाव्या इन्कमिंगवर चर्चा झाली. वरिष्ठांनी मांडलेल्या भूमिकेने निष्ठावंतांची कोंडी झाली आहे.
Published on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पुण्यातील पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीवर भाजपकडून महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच आणि भाजपामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये भाजप इच्छुक आणि प्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या नेत्यांचं भवितव्य ठरणार होतं.

देवेंद्र फडणवीस आगामी निवडणुकांबाबत नेमकी काय भूमिका घेणार यावर आपली संभाव्य उमेदवारी अवलंबून असल्याने फडणवीस यांच्या कानावर वरिष्ठ नेमकं कोणत्या गोष्टी घालणार याकडे इच्छुक कान लावून बसले होते. तर, पुणे शहरातील भाजपचे वरिष्ठ म्हणजेच शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फडणवीस यांच्या पुढे मांडलेल्या भूमिकेमुळे भाजपचे निष्ठावंत असलेल्या इच्छुकांच्या पोटामध्ये गोळा आला आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित असलेल्या इतर पक्षातील नेते मंडळींमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे.

पुण्यातील महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढली जाईल हे जवळपास या बैठकीमधून निश्चित झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्यांमध्ये इच्छुकांमध्ये थोडं आशेचं वातावरण तयार झालेल्या असतानाच पुण्याचे शहराध्यक्ष यांनी फडणवीस यांच्या समोर मांडलेल्या भूमिकेमुळे कुठेतरी नाराजी देखील उफाळून येऊ शकते असं बोललं जात आहे.

Devendra Fadnavis
Nashik Crime : धक्कादायक! आरपीआय नेत्याच्या कार्यालयात आढळलं चक्क भुयार, अनेक वर्षांपासून गुन्हेगारीसाठी वापर!

बैठकीत धीरज घाटे यांनी सांगितलं की शहरात जर स्वबळावर निवडणूक लढली तर भाजपचे किमान 105 नगरसेवक निवडून येतील. तसेच इतर 15 ते 20 जागांवर लक्ष केंद्रित केलं आणि योग्य उमेदवार दिले तर हा आकडा 125 पर्यंत पोहोचू शकतो. एक प्रकारे या विधानाच्या आधारे 15 ते 20 जागांवर इन्कमिंग करण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाचे रणनीती सुरू असल्याचे संकेत धीरज घाटे यांनी दिले आहेत.

त्यासोबतच मुरलीधर मोहोळ यांनी देखील शहरात ज्या जागा कठीण आहेत. त्या ठिकाणी इतर पक्षातील सक्षम कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये सामावून येता येईल, असं देखील सांगितलं आहे. एक प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या प्रवेश इच्छुकांना याद्वारे भाजपाच्या वरिष्ठांनी फडणवीस यांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नलच मिळून दिला असल्याचा देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

या सगळ्या गोष्टींमुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते जे अनेक वर्षापासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यामध्ये मात्र नाराजी पसरली आहे. वरिष्ठांनी निष्ठावंतांना संधी द्यावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांना समोर घेतील आणि फडणवीस देखील त्याला दुजोरा देतील अशीच काहीशी अपेक्षा घेऊन बसलेल्या भाजप इच्छुकांचा मात्र अपेक्षाभंग झाला असल्याचं दिसून येत आहे.

Devendra Fadnavis
Dilip Walse Patil Politics : 'निवडणुकीचं युद्ध आहे, तयारी ठेवा...', दिलीप वळसे पाटलांनी फुंकले रणशिंग, खासदार कोल्हेंवरही निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com