Kalokhe Murder Case Bharat Gogawale Vs Sudhakar Ghare And Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Raigad murder Case : मंगेश काळोखे हत्याप्रकरण; गोगावलेंनी हत्येचं कारण सांगताच, संशयित राष्ट्रवादीच्या घारेंचा खळबळजनक दावा करणारा व्हिडिओ समोर... (Video)

Kalokhe Murder Case Bharat Gogawale Vs Sudhakar Ghare And Sunil Tatkare : खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर येथे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता या प्रकरणावरून मंत्री भरत गोगावले यांनी थेट आरोप करताना मोठी मागणी केली आहे.

Aslam Shanedivan

  • खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांची हत्या झाली.

  • या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव समोर आल्याने राजकीय वातावरण तापले.

  • शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून सुनील तटकरे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या झाली आहे. या हत्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव समोर आलंय, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशातच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी काळोखे यांच्या हत्येचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर करताना या प्रकरणातील ज्यांची नावे समोर येत आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तर या प्रकरणात घारे यांनी त्यांचे नाव समोर येताच आपली भूमिका स्पष्ट करताना आपला यात कोणताच संबंध नसल्याचे म्हटलं आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी देखील या प्रकरणाचा संपूर्ण तापास व्हावा, योग्य कायदेशीर शिक्षा व्हावी अशीच आपल्या पक्षाची मागणी असल्याचेही म्हटलं आहे.

नगर पालिकेच्या निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला त्यातूनच राजकीय सूडबुद्धीतून मंगेशची निघृण हत्या झाल्याचा हल्लाबोल भरत गोगावले यांनी केला आहे. यावेळी त्यांनी दिवंगत नगरसेवक मंगेश हे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होते. त्याचवेळी पाच ते सहा लोकांनी त्यांच्यावर जबर हल्ला केला. त्यांना आयुष्यातून उठवलं. यामध्ये सुधारकर घारे आणि भगत हे प्लॅनिंग मास्टर असल्याचा आरोपही यावेळी गोगावले यांनी केला आहे.

तसेच त्यांना, मंगेश यांची ही नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून आमदारकीच्या वेळी त्यांनी चांगलेच काम केलं यामुळेच आमची शीट खोपोलीत बसली. हीच गोष्ट त्याच्या मारेकऱ्यांना खूपत होती. त्यातच नगर पालिकेच्या निवडणुकीत झालेला पराभवही जिव्हारी लागलाय. यातूनच त्यांची हत्या झाली. जी राजकीय सूडबुद्धीतून झाल्याचे गोगावले यांनी म्हटलं आहे.

तर या मारेकऱ्यांचे कर्ते करीवते जे होते, ते येथे सभा घेवून गेले. जे दुसऱ्यावर शिंतोडे उडवत होते. त्याच्या कार्यकर्त्यांनी काय केलं असा सवाल ही गोगावले यांनी केला आहे. तर या प्रकरणात जे जे आरोपी आहेत. ज्यांनी नावे समोर आली आहेत. यातील कोणीच सुटता कामा नये. यांना त्वरीत अटक व्हावी.

यादरम्यान या प्रकरणानंतर सुधाकर घारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपण एका धार्मिक ठिकाणी असून आपण येथे खोटं बोलणार नाही. मी शपथ घेवून सांगतो की या घटनेत आपला कोणताच संबंध नाही. ज्याची हत्या झाली ते आपल्या नात्यातील होते. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवावा तितका कमी असल्याचेही असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यावेळी घारे यांनी, ही घटना घडल्यानंतर मी एक बातमी वाचली ज्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट आपले नाव घेतले. जे फक्त राजकीय स्वार्था पोटी केलं जातयं.

पण आता यात असेही समोर येत आहे की माझ्यासह भगत याचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला आहे. थोरवेंच्या भावाने आंदोलन करत हे केलं आहे. पण माझा पोलिस प्रशासन आणि न्याय देवतेवर विश्वास असून मी असं घाणेरडं काम करणार नाही. पण त्यांनी याबाबत योग्य चौकशी करून अशी मागणी आहे. तसेच या गुन्हा ज्यांना सहभाग त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच जेव्हा पोलिस प्रशासनाला या प्रकरणात तपासासाठी गरज असेल त्यावेळी हजर राहून मदत करेन. तर ज्या काळोखे कुटूंबावर हा दु:खद प्रसंग ओढावला त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. मंगेश काळोखे यांची हत्या कुठे झाली?
खोपोली शहरात ही घटना घडली आहे.

2. या हत्या प्रकरणात कोणाचे नाव समोर आले आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव चर्चेत आले आहे.

3. सुधाकर घारे यांची भूमिका काय आहे?
आपला या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

4. शिवसेनेची भूमिका काय आहे?
मंत्री भरत गोगावले यांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

5. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत मत काय आहे?
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निष्पक्ष चौकशी आणि दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT