MLA Rajan Salvi Sarkarnama
कोकण

Politics in Kokan : 'वाघ एकला राजा, बाकी सगळा खेळ माकडांचा...' एसीबीच्या धाडीनंतर साळवींनी दाखवली झलक

Rajan Salvi : विरोधकांना सूचक इशारा देत आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीत बॅनरबाजी...

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीनंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. अशातच आता रत्नागिरी शहरात आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'वाघ एकला राजा, बाकी सगळा खेळ माकडांचा...' अशा स्वरूपाची ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात करण्यात आलेली बॅनरबाजी हा विरोधकांना सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे.

रत्नागिरी (Ratnagiri) शहरात दोन ते तीन ठिकाणी अशा स्वरूपाचे भव्य बॅनर लावण्यात आले आहेत. कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष असेही या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभर आमदार राजन साळवी (MLA Rajan salvi) यांची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या चार ते पाच ठिकाणी तपासणीसाठी एसीबीची (ACB) पथक दाखल झाली होती.

आमदार राजन साळवी यांचीही काल दिवसभर चौकशी सुरू होती. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर साळवी यांनी मला अटक करा, माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी या सगळ्याला सामोरा जायला तयार आहे, अशा स्वरूपाची ठाम भूमिका घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार साळवी यांच्यावर कारवाईचे वृत्त समजताच त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी काल दिवसभर होती. कार्यकर्त्यांकडून सरकारच्या नावानं, तसेच विद्यमान पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याही नावाने घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, साळवी यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईमागे सरकारचा व पालकमंत्र्यांचाही हात असेल, असाही थेट आरोप केला आहे. त्यानंतर आता दुसर्‍याच दिवशी रत्नागिरी शहरात करण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे या बॅनरची चर्चा अवघ्या जिल्ह्यात रंगली आहे.

(Edited By - Rajanand More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT