Solapur News : कुंभारी येथील रे नगरमधील गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या वेळी प्रास्तविक करताना या प्रकल्पाचे संकल्पक माजी आमदार नरसय्या आडम यांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र, तातडीने आपली चूक सुधारत त्याबाबत स्पष्टीकरणही दिले. त्याचवेळी उपस्थितांमधून मात्र एकच गोंधळ झाला. (Adam Master mentioned Uddhav Thackeray as Deputy Chief Minister in front of Modi...)
सोलापूरच्या कुंभारीतील रे नगर येथील घरांचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात होत आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी आमदार नरसय्या आडम या वेळी व्यासपीठावर उपस्थित आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी आमदार आडम मास्तर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. त्यावेळी उपस्थितांमधून एकच गलका झाला. मात्र, आडम मास्तर यांनी आपली चूक लगेच सुधारली. माफ करा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे अनेकवेळा एकत्र येतात, त्यामुळे या दोघांची नावे माझ्या तोंडात बसली आहेत. त्यामुळे माझ्याकडून तो चुकून उल्लेख झाला. मला माफ करा, असे म्हणत माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी तातडीने आपली चूक सुधारली.
दरम्यान, आडम मास्तर यांनी विजेच्या संदर्भात काही प्रश्न मांडले. तसेच, व्याज आणि घरांचा हप्ता याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्या. पायाभूत सुविधांसाठी काही निधीचीही मागणी केली. त्याचबरोबर उर्वरीत १५ हजार घरांचे कामही येत्या वर्षअखेरपर्यंत होईल, असेही नरसय्या आडम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.