Raigad Ambenali Ghat road accident today Sarkarnama
कोकण

Ambenali Ghat Accident : रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून सातारच्या 8 जणांचा जागीच मृत्यू, मृतांची नावे आली समोर

Scorpio accident Raigad: अपघाताची माहिती मिळताच विविध रेस्क्यू टीम, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. मात्र, स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळल्यामुळे प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले.

Jagdish Patil

8 Satara Tourists Killed After Scorpio Falls Into Gorge : रायगडच्या आंबेनळी घाटात सोमवारी (ता.२५) पहाटे भीषण अपघात झाला आहे. कोकणातून साताऱ्याकडे जात असलेली स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्याने गाडीतील आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या गाडीतील सर्व जण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गातील आंबेनळी घाटात हा अपघात घडला.

या अपघाताची माहिती मिळताच विविध रेस्क्यू टीम, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. मात्र, स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळल्यामुळे प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले.

दरम्यान, अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीचा क्रमांक MH 11, DN 2340 आहेत. तर या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आता समोर आली आहेत. त्यामध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18),

उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25), नितीन किसन नायकोंडे (वय 35). या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT