BJP  Sarkarnama
कोकण

BJP Setback : कोकणात भाजपला राजकीय धक्का : बावनकुळेंचा दौरा संपताच, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

BJP Major Setback in Raigad Over Rajesh Lad NCP Entry : काही दिवसापूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि कर्जत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला होता. आता त्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला असून भाजपला मोठा राजकीय फटका बसला आहे.

Aslam Shanedivan

Raigad Politics : रायगड जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमात भाजपचा अजेंडा चालल्यावरून मोठा वाद काहीच तासांच्या आधी रंगला होता. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर गोगावले यांनी आपण थेट राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. ज्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेची राज्यभर चर्चा होत असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि कर्जत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या राजेश लाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राजेश लाड हे माजी आमदार सुरेश लाड यांचे पुतणे असून त्यांनी खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले आहे. या प्रवेशामुळे रायगडमध्ये भाजपला मोठा राजकीय फटका बसल्याचे मानले जात आहे.

राज्यात महायुतीची सत्ता असून, भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत सहभागी आहेत. तरीदेखील आधी-मधी तिन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाही. अशीच कुरघोडी राष्ट्रवादीने रायगड जिल्ह्यात केली असून, भाजपचा नेता पळवला आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सुधाकर घारे यांची ताकद आता वाढली आहे.

जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात राजेश लाड यांनी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सुतारवाडी येथे पार पडला. राजेश लाड हे भाजपचे कर्जत शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. तसेच ते कर्जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्षही राहिले असून, परिसरात त्यांचा दबदबा आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी त्यांनी कर्जत शहर भाजपचे मंडळ अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. पक्षातील तीव्र गटबाजी आणि वरिष्ठ नेत्यांचे याकडे असलेले दुर्लक्ष याला कंटाळूनच त्यांनी हे पद सोडले होते. तसेच पक्षाचाही राजीनामा देत भाजप सोडली होती. यानंतर ते कोणता राजकीय निर्णय घेतात, याकडे कर्जतसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, अखेर लाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, पक्षातील गटबाजीमुळेच भाजपला कर्जतमध्ये धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT