BJP Setback : केंद्रीय मंत्र्यांनंतर पूनावाला अन् आता भाजप आमदाराचाही तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात उलथापालथ

BJP Leader MLC Devesh Kumar Resigns : नीट पेपरफुटीनंतर देशभर केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोषाची लाट उसळली. ज्यात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

BJP Setback in Bihar : नीट पेपरफुटीविरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती. तर विद्यार्थ्यांवरील दिल्ली पोलिसांचा अमानुष लाठीमार व अश्रुधुराच्या वापराने या आंदोलनाला अधिक धार आली. ज्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यानंतर आता भाजपला मोठे धक्के बसत असून, राष्ट्रीय प्रवक्त्यानेदेखील पक्षाची साथ सोडली आहे. फक्त साथच सोडली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. अशातच आता बिहारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, आमदाराने आपला तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यासह देशभर मोठ्या प्रमाणात नीट पेपरफुटीविरोधात जनआंदोलन उसळले असतानाच कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले. दरम्यान, २० जुलै रोजी जंतर-मंतर आणि संसद मार्चदरम्यान पेपरफुटीविरोधात व सोनम वांगचुक यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला. तसेच, यावर आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांनादेखील दिल्ली पोलिसांनी थेट उचलले. ज्यावर देशभरात तीव्र संताप व्यक्त केला गेला.

अखेर मोदी सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यानंतर आता देशभर भाजपला मोठे धक्के बसताना दिसत आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या शहजाद पूनावाला यांनी भाजपला रामराम करत राजीनामा दिला. राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पूनावाला यांनी राजीनामा दिल्याने भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

BJP
BJP Setback : कोकणात भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचा तडाफडकी राजीनामा : नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

अशातच बिहारमध्ये भाजपला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार देवेश कुमार यांनी आपला राजीनामा विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सोपवला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या या रिक्त झालेल्या जागेवर आता दीपक प्रकाश यांचे नाव चर्चेत आले आहे.

BJP
Kolhapur BJP Setback : कोल्हापूर महापालिकेत भाजपला मोठा धक्का! सर्वाधिक मतांनी विजयी नगरसेवकाचा जात पडताळणी दाखला अवैध

दीपक प्रकाश यांच्या मंत्रिपदावरील नियुक्तीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. अशातच देवेश कुमार यांच्या राजीनाम्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर देवेश कुमार यांच्या या निर्णयामुळे दीपक प्रकाश यांचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्या मंत्रिपदाला घटनात्मक संरक्षण भाजपकडून दिले जाऊ शकते, असे तर्क वर्तवले जात आहेत. तर देवेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com