रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायती आणि 11 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे.
सहा ठिकाणी महिला नगराध्यक्षपदे राखीव ठरल्याने महिला नेतृत्वाला चालना मिळणार आहे.
आठ ठिकाणी खुला प्रवर्ग जाहीर झाल्याने पुरुष आणि महिला इच्छुकांच्या उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे.
Raigad News : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी घोषणा झाली असून आज मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यातील 38 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 9 जागा अनुसूचित जातीसाठी, 7 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि 20 जागा मागासवर्ग प्रवर्गासाठी असणार आहेत. तर यावेळी रायगड जिल्ह्यातील देखील पाच नगरपंचायती आणि 11 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या आजच्या नगराध्यक्षाच्या सोडतीत रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदेंचा समावेश आहे. या सोडतीमध्ये माथेरान, म्हसळा, अलिबाग, उरण, खालापूर, खोपोली नगरपरिषदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. तर पेण नगरपरिषद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. कर्जत, रोहा, श्रीवर्धन नगरपरिषदेंवर ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. महाड नगरपरिषद ही ओबीसीसाठी आरक्षित झाली आहे.
तळा आणि माणगाव नगरपंचायतीही खुल्या प्रवर्गात आरक्षित झाल्या असून पाली नगरपंचायतीवर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. तर मुरुड जंजिरा, पोलादपूर ओबीसी प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
एकीकडे जिल्ह्यातील पाच नगरपंचायती आणि 11 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. तर सहा ठिकाणी महिला राज येणार आहे. तर सहा ठिकाणी आठ ठिकाणी खुला प्रवर्गाची घोषणा झाल्याने आता इच्छुकांच्या तयारीला वेग येणार आहे.
दरम्यान रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद वाढला आहे. खासदार सुनीट तटकरे यांच्यावर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार टीका करत राष्ट्रवादीशी युती नाहीच असा पवित्रा घेतला आहे.
त्यांच्या पवित्र्यावरून राष्ट्रवादीने देखील निर्वाणीचा इशारा देताना आम्हालाही शिवसेनेची गरज नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आगामी स्थानिकच्या निवडणुकीत महायुतीत युती न राहिल्यास मैत्रिपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे.
तसेच येथे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह शेकाप आणि इतर स्थानिक आघाड्या कोणता निर्णय घेतात ते ही पाहावं लागेल. तर शिवसेना आणि मनसे युती झाल्यासही स्थानिकला राजकीय समिकरणे बदलणार आहेत.
प्रश्न 1: रायगड जिल्ह्यात किती नगरपरिषदांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे?
👉 रायगड जिल्ह्यातील 16 (5 नगरपंचायती + 11 नगरपरिषदा) ठिकाणांची सोडत जाहीर झाली आहे.
प्रश्न 2: किती ठिकाणी महिला नगराध्यक्ष होणार आहेत?
👉 एकूण सहा ठिकाणी महिला नगराध्यक्षपद राखीव ठरले आहे.
प्रश्न 3: किती ठिकाणी खुला प्रवर्ग जाहीर झाला आहे?
👉 आठ ठिकाणी नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.
प्रश्न 4: या आरक्षणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 महिला नेतृत्वाला चालना मिळेल आणि स्थानिक स्तरावर नवीन चेहेरे उदयास येतील.
प्रश्न 5: इच्छुक उमेदवारांची पुढील तयारी काय आहे?
👉 आता उमेदवार प्रचार आणि पक्षनिवडीसाठी सज्ज होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.