
Ratnagiri Politics : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून अद्याप रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा तेढ सुटलेला नाही. तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य करून मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी आपल्या पक्षातील मंत्री रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी दबाव वाढवत असल्याचा म्हटलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीतील मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन रविवारी (ता.11) पालकमंत्र उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी फलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, सुभाष बने, प्रदीप साळवींसह एसटी महामंडळाचे अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याच कार्यक्रमात भरत गोगावले यांनी उदय सामंत यांच्या राजकीय फटकेबाजीचा धागा पकडत हा गौप्यस्फोट केला आहे. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामंत यांनी, या बसस्थानकाचे काम फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच पूर्ण झाल्याचे सांगत श्रेय आपल्याकडे खेचलं आहे.
तसेच आपल्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद येण्यात भरत गोगावले यांचे योगदान आहे. राज्यात राजकीय उलथापालथी होत असतानाच पालकमंत्रीपदाचा तेढ निर्माण झाला होता. त्यावेळी गोगावले यांनी ते मला मिळावे म्हणून आग्रह धरला होता. यामुळेच रायगडचे पालकमंत्रिपद माझ्याकडे आले होते. त्यामुळेच आपल्याला शिवरायांचा 350 वा राज्याभिषेक करण्याचे भाग्य लाभल्याचे म्हटले.
सामंत यांच्या वक्तव्याचा धागा धरत गोगावले यांनी, निधी कसा आणायचा आणि तो कसा कामी लावायचा याचे गणित ते चांगेल सोडवतात, असा चिमटा काढला. तर त्यांच्या या कामामुळेच आम्ही त्यांना विकासरत्न म्हणत असल्याचेही गोगावले यांनी सांगितले.
याचवेळी गोगावले यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिपदासाठी सामंत यांनी आग्रह धरला. तसेच ते आताही पालकमंत्रीपद मला मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे तेथे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. पण दबक्या आवाजात रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेत लॉबींग सुरू आहे का? अशीही आता चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.