Khopoli murder case update: रायगड जिल्ह्यातील खोपोली इथल्या मंगेश काळोखे हत्याप्रकरणात एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.
मंगेश काळोखे यांची हत्येसाठी 20 लाख नव्हे, तर एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हल्लेखोर हत्येनंतर मुख्य आरोपी रवींद्र देवकर याच्या कार्यालयात लपून होते, असा दावा देखील केला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पत्नी मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली. खोपोली पोलिसांनी या हत्येच्या कटात अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा नोंदवला. हत्येत आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे यांचे मंगेश काळोखे हे कट्टर समर्थक होते. या प्रकरणात आता आमदार थोरवे यांनी खळबळ उडवून देणारे आरोप केले आहेत. 'मंगेश यांची हत्या कटकारस्थान करून करण्यात आली आहे. यासाठी हल्लेखोरांना 20 लाख रुपयांची नव्हे, तर एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हल्लेखोर हे मुख्य आरोपी रवींद्र देवकर याच्या कार्यालयात लपून होते,' असा गंभीर आरोप थोरवे यांनी केला आहे.
मंगेश थोरवे यांनी, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आणखी काही आरोपी शिल्लक आहेत. त्यांना सुध्दा अटक झाली पाहिजे. मंगेश काळोखे यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबाचा देखील यामध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. घटनेपासून ही दोन्ही कुटुंब पसार असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी कली.
मंगेश काळोखे यांची हत्या एकट्या रवींद्र देवकर यांनी केलेली नसून त्यांना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींचा अद्याप शोध नाही, अशी नाराजी देखील आमदार थोरवे यांनी व्यक्त केली. खोपोला नगरपालिका निवडणुकीत काळोखे यांच्या पत्नी मानसी यांनी, अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला देवकर यांचा 700 हून अधिक मतांनी पराभव केला. या पराभवाचा राग आणि जुन्या राजकीय वैमनस्यातूनच हा कट रचला गेल्याचा संशय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.