Sunil Tatkare, jayant patil, anant gite Sarkarnama
कोकण

Raigad News : रायगडमध्ये झालेली चूक सुधारणार; जयंतरावांनी तटकरेंविरोधात फुंकले रणशिंग

Jayant Patil on Sunil tatkare : इंडिया आघाडीच्या नेतेमंडळीच्या उपस्थित तटकरेंविरोधात रणशिंग फुंकले आहे.

Sachin Waghmare

Raigad : गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्या पाठीशी राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्हाला त्यांना इच्छा नसताना त्यांना मदत केली. त्यामुळे तटकरे अल्पशा मताने लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे शिवसेनेच्या अनंत गीते यांना निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता आम्ही झालेली चूक परत करणार नाही. आम्ही ठाकरे गटाचे उमेदवार गीतेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याचे सांगत शेकापचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी सर्व इंडिया आघाडीच्या नेतेमंडळीच्या उपस्थित तटकरेंविरोधात रणशिंग फुंकले आहे.

श्रीवर्धन येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते उपस्थित होते. यानिमित्ताने 'इंडिया' आघाडीचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यामुळे हे नेतेमंडळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जयंतराव पाटील यांनी भर कार्यक्रमातच माजी खासदार अनंत गीते यांचे नाव घेत घोषणा केल्याने सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

गेल्या निवडणुकीत जयंतराव यांनी आमची मोठी चूक झाली असल्याचे मान्य केले. आमच्या वडिलांनी सांगितलं आहे की, शरद पवार यांना कधी सोडायचं नाही. माझी फक्त त्यांना विनंती आहे की कुणाच्याही डोक्यावर हात ठेऊ नका. आपल्याला बदला घ्यायचा असल्याचे सांगत तटकरे यांच्यावर घणाघाती टीका करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण बँकेत दोन वेळा आले होते. त्यांचं कायम बँकेकडे लक्ष असते. आज मुस्ताक अंतुले यांना बोलावलं कारण आमच्या सोबत अंतुले आहेत.

SCROLL FOR NEXT