रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद चिघळला आहे.
यादरम्यान खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले आणि भाजप नेते प्रवीण दरेकर एका व्यासपीठावर दिसणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमामुळे रायगडच्या राजकारणात नवीन समीकरणे वळण घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Raigad News : राज्यात महायुतीचे सरकार येऊन जवळपास आता वर्ष होईल. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाही. रायगडमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे आमदार तर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पदाधिकारी पालकमंत्री पदावरून एकमेकांवर उट्टे काढताना दिसत आहेत. यामुळे येथील राजकीय वातावरण संघर्षमय झाले आहे. पण आता एका कार्यक्रमा निमित्त तटकरे आणि गोगावले एकाच मंचावर येणार आहेत. ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तटकरे आणि गोगावले यांच्यात पालकमंत्री पदावरून वाद उफाळला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की शिवसेनेच्या आमदारांनी महायुती न मानता फक्त भाजप-राष्ट्रवादी युती असेच म्हणायचे सुरू केले. तर राष्ट्रवादीने देखील आम्हाला शिवसेनेची गरज नाही म्हणत वादात तेल ओतण्याचे काम केले. आता हा वाद जिल्ह्यातील महायुतीलाच संकटात आणण्याची शक्यता आहे.
याच दरम्यान तटकरे आणि गोगावले एकाच मंचावर येणार आहेत. ते गोरेगाव येथे ओम फाऊंडेशनने आयोजित केलेल्या विजयराज खुळे यांच्या अमृत मोहत्सवी वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात एकत्र येणार आहेत. यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकरही उपस्थित असणार आहेत.
गोरेगाव येथील राजमाता जिजाऊ मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात तटकरे आणि गोगावले एकत्र येत असून येथे आता कोणती राजकीय जुगलबंदी होते याचीच उत्सुकता आता रायगडकरांना लागली आहे.
दरम्यान नुकताच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सभापतींसह गट आणि गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. नगरपालिका, नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचेही आरक्षणाची घोषणा झाली आहे. गले आहे.
यामुळे आता राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तटकरे आणि गोगावले पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येत आहेत. यामुळे या दोघांकडून राजकीय जुगलबंदी कशी होते. दरेकर यावर काय भाष्य करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
1. रायगडमध्ये वाद नेमका कशावरून आहे?
पालकमंत्री पदावरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात मतभेद निर्माण झाले आहेत.
2. सुनील तटकरे, भरत गोगावले आणि प्रवीण दरेकर कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत?
एका स्थानिक राजकीय कार्यक्रमात हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
3. या कार्यक्रमामुळे काय नवीन राजकीय समीकरणे तयार होऊ शकतात?
राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यातील नातेसंबंधावर या भेटीचा परिणाम होऊ शकतो.
4. रायगडचा पालकमंत्री सध्या कोण आहे?
सध्या या पदावरून कोणाला प्राधान्य द्यायचे यावरच वाद सुरू आहे.
5. या वादाचा महाराष्ट्र सरकारवर काही परिणाम होईल का?
राजकीय वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता असून पुढील निर्णय महत्त्वाचा ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.