CM Pramod Sawant Sarkarnama
कोकण

CM Pramod Sawant: रत्नागिरी सिंधुदुर्गासह रायगड, मावळमध्येही कमळ फुलणार; मुख्यमंत्र्यांना विश्वास

BJP Politics: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. रायगड रत्नागिरी मध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संवाद कार्यक्रम सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri:रायगड-रत्नागिरी सिंधुदुर्ग व मावळ लोकसभा मतदारसंघात (Raigad Ratnagiri Sindhudurg Maval Lok Sabha constituencies 2024) भाजपाचे कमळ फुलेल एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री तुमच्याकडे येतो रिव्ह्यू घेतो यातच तुम्ही समजा की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी हे मतदार संघ किती गांभीर्याने घेतले आहेत, असं सांगत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी तीनही लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलत एनडीएचेच उमेदवार विजयी होतील असा मोठा आत्मविश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.

भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे ते बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्री भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावरती आले होते लोकसभा निवडणुकीसाठी सध्या रायगड रत्नागिरी मध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संवाद कार्यक्रम सुरू आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण देवेंद्रजींना सांगितलं मी कोकण दौऱ्यावर चाललो आहे, तेथील कार्यकर्त्यांना काय सांगू एवढे वर्ष त्यांच्यावरती अन्याय झाला आहे, असं मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं त्यावेळी ते मला म्हणाले की त्यांना सांगा या वेळेला त्यांच्यावरती अन्याय होणार नाही असं सांगत या वेळेला रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुललं पाहिजे मी ही एक भाजपाचा कार्यकर्ता आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून यावेळी त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं.

गेली अनेक वर्ष सत्ता भोगलेला काँग्रेसने केवळ आजवर हात दाखवण्याचे काम केले. काँग्रेसच्या काळात टू जी थ्रीजी स्पेक्ट्रम अनेक घोटाळे झाले हे नव मतदारांना सांगा त्याला याची माहिती नाही आहे, गेल्या दहा वर्षाच्या काळात एकही घोटाळा झाला नाही सर्वांगीण विकास साधण्याचा काम पंतप्रधान मोदी यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना घटकांना हात देऊन विकसित भारत घडवण्याचे काम करत लोकाभिमुख योजना राबवल्या.महिला,किसान,युवा व गरीब कल्याण या चार सूत्रांवर काम करत अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत युवकांना एक लाख रुपयांचे कर्ज बँकेतून देऊन त्याची गॅरंटी मोदींची आहे आपल्या घरातला भाऊ सुद्धा आपल्याला जामीन राहणार नाही पण पहिल्या वर्षी एक लाख दुसऱ्या वर्षी दोन लाख दुसऱ्या वर्षी तीन लाख अशा स्वरूपाने उद्योग व्यवसायासाठी केवळ चार टक्के व्याजाने उद्योगासाठी कर्ज देत याची गॅरंटी मोदींनी घेतली आहे असं सांगत स्टार्टअप इंडिया, उज्वला गॅस या मोदींनी राबवलेल्या सगळ्या योजनेचा उल्लेख मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माचे लोकांचा विचार करत महाराष्ट्रातील मराठी माणसाला घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली. त्यानंतर 18 पगड जातींचा विचार याची आठवण कोणी केली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये या सगळ्या प्रकारच्या उद्योगांना सरकार दरबारी नोंद देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केलं त्यांना प्रशिक्षण देत व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना आणली.

एखादा राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला तुमच्या या मतदारसंघांमध्ये पाठवतात. त्यावेळेला आपण विचार करायला पाहिजे की उपमुख्यमंत्री देवेंद्रजींसाठी हे मतदार संघ किती महत्त्वाचे आहेत. भाजपाने हे तीनही मतदारसंघ किती गांभीर्याने घेतले आहेत याचा विचार तुम्ही केला पाहिजे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोकण वासिया सज्ज आहेत असे सांगत त्यांनी 'भारत माता की जय' 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, 'मोदी जी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा स्वतः घोषणा कार्यकर्त्यांसह देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं.

काश्मीरच्या प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तिथे केवळ टेररिझम होता कधी कोण मरेल हे सांगता येत नव्हतं आज तिथे टुरिझम आहे प्रत्येकजण काश्मीर मध्ये जाऊन तुम्ही जाऊन चा अनुभव घेत आहे हा बदल झाला आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर टीका करत पूर्वी यूपीए म्हणजेच ही आताची नाव बदललेली इंडिया आघाडी आहे सगळे तेच आहेत त्यात कोणीही नवीन आलेले नाही आहे म्हणजेच 'ओल्ड माय नेम इज न्यू बॉटल' ते हिंदू धर्मावर ते बोलणारे अशी टीका मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेस आघाडीवर केली.

राम लल्ला वही आयेंगे मंदिर वही बनायेंगे हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीदवाक्य होतं आणि काँग्रेसवाले काय म्हणत होते की राम लल्ला का मंदिर बनायेंगे तारीख कब बतायेंगे अशी टीका काँग्रेस करत असे आणि आता त्यांना सांगतो की राम लल्ला ची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि ती तारीख 22 जानेवारी होती आम्ही रामलल्लाच दर्शन घेतलं असं सांगत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला.

यावेळी माजी आमदार बाळ माने डॉ.विनय नातू यांनी रत्नागिरी रायगड व रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा भाजपलाच मिळाव्यात अशी जोरदार मागणी यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करत ही आमची मागणी आपण दिल्लीत बैठकीला जात आहात तर पोहोचवा अशा स्वरूपाचे सुतोवाच करत या दोन्ही जागांची मागणी भाजपाने केली आहे. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित सगळ्याच नेत्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले धैर्यशील पाटील यांचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार असा करत थेट राष्ट्रवादीलाच आव्हान दिले आहे.

यावेळी व्यासपीठावर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,माजी आमदार डॉ. विनय नातू, बाळ माने,माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष केदार साठे, महिला आघाडीच्या स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष संजय सावंत, बाळासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT