Sangli Lok Sabha 2024: सांगलीत ‘वंचित’ काँग्रेसला तारक की भाजपला मारक

Sangli Lok Sabha Constituency 2024:आता वंचितचा समावेश इंडिया आघाडीत झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांना ताकद मिळणार आहे.
Sangli Lok Sabha Constituency 2024
Sangli Lok Sabha Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Sangali: गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी फॅक्टरमुळे मोठा फटका बसला. त्यामुळे या वेळी होणार्‍या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने ‘वंचित’ला बरोबर घेतले. सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 25 टक्के म्हणजे तीन लाख मते घेतली होती. त्याचा फायदा भाजपला झाला. आता ‘वंचित’च्या समावेशाने सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला तारक होणार की, भाजपला मारक होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Sangli Lok Sabha Constituency 2024)

वंचितने 2019 मध्ये लोकसभेच्या 47 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी वंचितला एकही जागा जिंकता आली नव्हती. वंचितची ‘एमआयएम’सोबत युती होती. त्यामुळे वंचितमुळे एमआयएमला संभाजीनगर (औरंगाबाद) विजय मिळाला. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला लोकसभा निवडणुकीत 7 ठिकाणी फटका बसला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून उभे राहिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. सांगलीत वंचित आघाडीचे उमेदवार, विद्यमान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 3 लाख मते मिळवली होती. मतविभागणीमुळे विशाल पाटील यांचा पराभव झाला होता, तर भाजपचे संजयकाका पाटील विजयी झाले होते. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीतदेखीलही तेच घडले.

Sangli Lok Sabha Constituency 2024
Maharashtra Budget 2024 Live Marathi News: जरांगेंच्या तोंडातून आता 'तुतारी'चा आवाज येतोय: नितेश राणे

आता राज्यातील सत्तासमीकरणे बदलली आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीने राज्यातील भाजप विरोधातील असलेले सर्व पक्ष एकत्र करण्याचे काम सुरू केले आहे. 2019 ला काँग्रेस, राष्ट्रवादीला सर्वाधिक धोकादायक ठरलेला पक्ष वंचितला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेतले. वंचितच्या रूपाने महाविकास आघाडीत नवा भिडू आला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडी आल्यास काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे, तर भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.प

2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली होती. त्यावेळी सांगलीची जागा माजी खासदार शेट्टी यांना सोडली. काँग्रेसमध्ये खळबळ उडाली, पण विशाल पाटील यांना स्वाभिमानीचे उमेदवार घोषित केले. या घडामोडी सुरू असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप व खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडत वंचितकडून लढले. त्यामुळे पारंपरिक काँग्रेसला मतविभागणीचा फटका बसला.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना 5 लाख 8 हजार मते मिळाली, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार मते मिळाली. दीड लाख मतांनी संजयकाकांचा विजय झाला. या निवडणुकीत वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी 3 लाख मते घेतली होती. तब्बल पंचवीस टक्के मते यांनी घेतली होती. याचा फटका विशाल पाटील यांना बसला होता.

आता वंचितचा समावेश इंडिया आघाडीत झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांना ताकद मिळणार आहे. याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांचा वाटत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या मत विभाजनीमुळे फायदा झाला. यंदा मतविभागणी टाळली जाईल. त्यामुळे वंचित काँग्रेसला तारणार की, भाजपला मारणार याकडे लक्ष राहील.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com