Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Raigad Drought Row : दुष्काळावरून राजकीय संघर्ष, जिल्हाध्यक्ष चव्हाणांचा तटकरेंवर गंभीर आरोप

NCP SP Ravindra Chavan Targets Sunil Tatkare Over Drought : रायगड जिल्ह्यातील वाद काही केल्या शांत होताना दिसत नाही. विविध कारणांवरून शिवसेना तटकरेंवर निशाना साधत असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तटकरेंवर आरोप केले जात आहेत.

Aslam Shanedivan

Raigad News : कोकणातील रायगड जिल्ह्यात एकीकडे राष्ट्रवादी विरूद्ध तकटरे असा सामना रंगला असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा यात समावेश झाला आहे. जिल्ह्यातील दुष्काळावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बाकीच्या १४ तालुक्यांना वंचित ठेवण्याचे काम तटकरेंनी केल्याचा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. तसेच जिल्ह्यातील वगळलेले १४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात कमी पाऊस पडल्याने आणि त्यामुळे जलसाठा मर्यादित राहिल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तब्बत २६५ तालुक्यात ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे. नुकताच राज्यात पाणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे.

येत्या १६ तारखेपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान दहा टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. यामुळे ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत (तब्बल १ वर्ष) पाण्याचे नियोजन करत पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे लागणार आहे. हे आदेश सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी देण्यात आले आहेत.

दरम्यान २६५ तालुक्यांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये केवळ एकाच तालुक्याचा समावेश हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर झाल्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटातील जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट तटकरेंनाच कारण ठरवले आहे.

त्यांनी, रायगड जिल्ह्यामध्ये खासदार तटकरे यांचा केवळ एकच तालुका हा लाडका आहे. म्हणूनच श्रीवर्धन दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. मात्र बाकीच्या १४ तालुक्यांना वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे वगळलेल्या १४ तालुक्यांनाबाबत मागणी केली आहे.

चव्हाण यांनी आपल्या निवेदनात १४ तालुक्यांना वगळण्याचे काम खासदार तटकरे यांनी केले आहे. यामुळे उरलेले चौदा तालुकेही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना सवलती आणि मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, अशीही मागणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्यांनी केली आहे.

तसेच चव्हाण यांनी, रायगड जिल्ह्यात मुळातच पावसाची सुरूवात मे शेवटच्या आठवड्यात झाली असून नंतर पावसाचे दडीच मारली आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर जे भात पीक आले तेही आता पाणी नसल्याने पिवळी पडू लागले आहे .

अशा परिस्थितीत केवळ तटकरे यांच्या एकाच तालुक्यात दुष्काळ जाहीर करून बाकीच्या तालुक्यांना वंचित ठेवणे उचित नसल्याचा हल्लाबोल तटकरे निवेदनाद्वरे केला आहे. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये व शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत या प्रमुख मागणीसह दुधाला वाढीव बाजारभाव मिळावा अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांची दखल प्रशासनाने घेतली नाही तर तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT