Sunil Tatkare : खासदार तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका! काही तासांतच प्रशासनाने सूत्रे फिरली; महत्वाचे आदेश काढले

Sunil Tatkare Uday Samant Development Works Dispute News : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे रौद्ररूप पहायला मिळाले असून त्यांनी थेट हक्कभंग आणू’ असा सज्जड इशाराच दिला होता. आता त्यांनी दिलेली मात्रा कामी आली असून प्रशासनाची सूत्रे फिरली आहेत.
Ratnagiri District Planning Committee meeting
Ratnagiri District Planning Committee meetingsarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : नुकताच रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठक झाली असून या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी विकासकामांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. मंजुरी मिळालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप करत त्यांनी ‘माझी कामे अडवली तर थेट हक्कभंग आणू’ असा सज्जड इशारा दिला होताय तर पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत आठ दिवसांत सर्व कामांचे कार्यारंभ आदेश काढले जातील असे आश्वसन दिले होते. ज्यानंतर हा वाद शांत झाला होता.

दरम्यान आता पालकमंत्र्यांच्या मुदतीची वाट न पाहता प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. तटकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अवघ्या काही तासातच खेड तालुक्यातील सुमारे अडीच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना तातडीने कार्यारंभ आदेश देण्यात आले. सध्या घडामोडींची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीतील अंतर्गत ताणतणाव आणि प्रशासकीय दिरंगाईवर खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अखेर फलदायी ठरली. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत आपल्या मतदारसंघातील प्रलंबित कामांवरून खासदार तटकरेंनी प्रशासनाला थेट धारेवर धरल्यानंतर, अवघ्या काही तासांतच प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीची वाट न पाहताच बैठकीच्याच दिवशी खेड तालुक्यातील सुमारे अडीच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना तातडीने कार्यारंभ आदेश देण्यात आले.

Ratnagiri District Planning Committee meeting
Sunil Tatkare News : नजरा चुकविल्या, बोलणेही टाळले, पण बैठकीच्या आधी कदम-तटकरेंची एकाच खोलीत चर्चा? उदय सामंत, राणेंसह प्रमुख नेतेही उपस्थित

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार तटकरे यांनी विकासकामांच्या मंजुरीचा मुद्दा अतिशय जोरकसपणे मांडत आक्रमक पवित्रा घेतला होता. निधी उपलब्ध असून आणि प्रशासकीय मंजुरी मिळालेली असतानाही प्रत्यक्ष कामांचे कार्यारंभ आदेश का रोखले जात आहेत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तर विकासाच्या कामांमध्ये अडथळे आणले जात असतील तर त्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न विचारत त्यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले होते. तसेच ‘माझी कामे अडवली तर थेट हक्कभंग आणू’ असा सज्जड इशारा दिला होता.

यामुळे बैठकीतील वातावरण काही काळ कमालीचे तापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित विभागांशी चर्चा करून आठ दिवसांच्या आत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या आश्वासनानंतर हा वाद शांत झाला होता.

दरम्यान तटकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तर प्रशासनाकडून आठ दिवसांत प्रत्यक्ष कामांचे कार्यारंभ आदेश काढले जाणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अशातच प्रशासनात चक्र अत्यंत वेगाने फिरली असून आठ दिवसांची वाट न पाहता सोमवारी बैठकीच्याच दिवशी खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या जनसुविधा, पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील विविध विकासकामांना तातडीने वर्क ऑर्डर जारी करण्यात आल्या आहेत.

Ratnagiri District Planning Committee meeting
Sunil Tatkare : पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, पण रायगडमध्ये नवा वाद? दळवींच्या टीकेला तटकरेंचा दोनच शब्दांत टोला; 'मैदानापासून दूर राहणाऱ्यांना...'

बैठकीत झालेल्या या वादंगानंतर तात्काळ मिळालेल्या मंजुरीमुळे राजकीय वर्तुळात खासदार तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. एका बाजूला प्रशासकीय दिरंगाईवर ओढलेले ताशेरे आणि दुसऱ्या बाजूला पालकमंत्र्यांचा तत्पर निर्णय, यामुळे खेड तालुक्यातील प्रलंबित कामांचा मार्ग शेवटी मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com