उरणमध्ये निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून राजकीय वाद उफाळला आहे.
महिलांना शिवण मशीन व घरघंटी देण्याचे आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अस्लम कल्याणकर यांनी भाजप आमदार महेश बालदी यांच्यावर जुमलेबाजीचा आरोप केला आहे.
Raigad News : रायगडमधील राजकीय वादाचा पारा पुन्हा एकदा चढला असून आता शिंदेंची शिवसेना या वादात नसून हा वाद दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये होताना दिसत आहे. तर यावादाचे कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेली आश्वास असल्याचे समोर येत आहे.
आता याच आश्वासनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण विधानसभा उपाध्यक्ष अस्लम लियाकत कल्याणकर यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. तर भाजपने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच भाजप आमदार महेश बालदी ‘जुमलेबाज’ असून त्यांच्यावर ‘जुमलेबाजी’ केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. या आरोपानंतर आता येथील राजकीय वातावरण तापले असून भाजपकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आमदार महेश बालदी यांनी महिलांकडून शिलाई मशीन व घरघंटी देण्याची घोषणा करत तसे आश्वासन दिले होते. पण ते आतापर्यंत पूर्ण झालेले नाही. यावरूनच आता उरणमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. या आश्वासनावरून राष्ट्रवादीने भाजपला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
यावेळी अस्लम कल्याणकर यांनी, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांना आश्वासन दिले होते. आमदार बालदी यांनी सुमारे सात ते आठ हजार महिलांना शिलाई मशीन व घरघंटी देण्यात येईल असे म्हटले होते. तर यासाठी या महिलांकडून अर्ज देखील अर्ज भरून घेण्यात आले होते.
निवडणुकीपूर्वी महिलांना संयरोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भाजपने देत त्यांना प्रलोभन दाखवले. मात्र, आता निवडणूक पार पडून आता सव्वा वर्ष होत आहे. पण अद्याप महिलांना कोणतीही वस्तू भाजपने वाटप केलेली नाही. यामुळे ही केवळ निवडणुकीपुरती ‘जुमलेबाजी’ होती का असा सवाल कल्याणकर यांनी उपस्थित केला आहे.
तसेच त्यांनी, शिलाई मशीन व घरघंटी मिळण्यासाठी महिलांनी वारंवार आमदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा दावा केला आहे. सध्या भाजपकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर असून आता आश्वासनाबाबत त्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे.
1. उरणमध्ये वाद कशामुळे निर्माण झाला?
निवडणुकीपूर्वी दिलेल्या महिलांच्या योजनेच्या आश्वासनांवरून वाद निर्माण झाला आहे.
2. कोणावर आरोप करण्यात आले आहेत?
भाजप आमदार महेश बालदी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
3. कोणत्या योजनेबाबत वाद आहे?
शिवण मशीन आणि घरघंटी देण्याच्या योजनेबाबत वाद आहे.
4. किती महिलांनी अर्ज भरले होते?
सुमारे सात ते आठ हजार महिलांनी अर्ज भरले होते.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय दबाव वाढून योजनेबाबत चौकशी किंवा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.