

Mumbai News: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतून नऊ सदस्य मे महिन्यात निवृत्त होत आहेत. या निमित्तानं निवृत्त सदस्यांच्या निरोपाचा कार्यक्रम पार पडला. यात उद्धव ठाकरे, नीलमताई गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केनेकर यांच्यासह एकूण 9 सदस्यांचा समावेश आहे. पण या निरोपाच्या सभागृहातील भाषणानंतर थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भे़ट घेतली. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड दहा मिनिटं चर्चा झाली. या भेटीवेळी आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या भेटीतील चर्चेचा अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या नऊ आमदारांविषयी भाष्य केलं. त्यात उद्धव ठाकरेंचाही समावेश होता. यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा निरोप समारंभ होत आहे. राजकारणात मतभेद असतात पण वेगळं नातं असतं, ते नातं असत सहप्रवासाचं नातं, अनेक वर्षाचे आम्ही उद्धवजींसोबत सहप्रवासी राहिलो आहेत. उद्धवजी यांचा स्वभाव राजकारणी नाही, त्यामध्ये थोडं राजकारण कमी आहे, असं फडणवीसांनी म्हटलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राजकारणात ते लवकर आले, पण 2010 नंतर आमची जास्त जवळीक आली. मैत्रीची भावना आमच्यात त्यावेळी निर्माण झाली. आता देखील आहे, मात्र राजकीय भूमिका आता आमच्या वेगळ्या झाल्या. त्यांनी एखादा निर्णय घेताना कधीही परिणामाचा विचार केला नाही. ज्याला राजकीय चेहरा नाही अशा सर्वसामान्यांना राजकीय चेहरा देण्याचं काम त्यांनी केल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सभागृहात सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे यांचाही तसा स्वभाव होता. एकदा निर्णय ठरला की, तो घेऊन टाकायचा. त्यांनी कधीच राजकारणात एखादा निर्णय घेताना त्याच्या परिणामाची चिंता केली नाही. तोच स्वभाव उद्धवजींचाही आहे. त्यामुळे ते अनेकवेळा निर्णय घेतात, कधीही त्यांच्या निर्णयामुळे वेगळी परिस्थितीही निर्माण होते. पण त्याच्या परिणामाची चिंता ते कधीही करत नाही,असं कौतुकही ठाकरेंचं फडणवीसांनी केलं.यावेळी त्यांनी पु.ल. देशपांडे यांच्यानंतर जर कुणी 'कोट्या'धीश म्हणावे, तर मी ते उद्धव ठाकरे यांना म्हणेन असंही मुख्यमंंत्री यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेतील 9 सदस्यांच्या निरोप समारंभावेळी म्हणाले, आज 9 सदस्य निवृत्त होत आहेत. कधी कधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतात. पण आपण आज हळव्या वळणावर आलो आहोत. 9 सदस्य आहेत, ज्यात उद्धव ठाकरे साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेब आज निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो,पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.