Shivsena Vs Ncp; bjp ncp alliance; Sunil Tatkare and Bharat Gogawale  sarkarnama
कोकण

Shivsena Vs Ncp : ‘जिंकूनही तहात हरली’ शिवसेना! गोगावलेंनी टाकलेला डाव तटकरेंनी उधळला; भाजप-राष्ट्रवादी युतीवर शिक्कामोर्तब?

bjp ncp alliance Vs shivsena : रायगड जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी युतीवर शिक्कामोर्तब झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी टाकलेल्या गुगलीवर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या सत्ता स्थापनेच्या दाव्याची विकेट गेली आहे.

Aslam Shanedivan

  1. रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकूण 35 जागांचे संख्याबळ असून सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत निश्चित झाले आहे.

  2. सुनिल तटकरे आणि धैर्यशिल पाटील यांनी भाजप-राष्ट्रवादी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

  3. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले जाण्याची शक्यता असून वरिष्ठ पातळीवरील अधिकृत घोषणा बाकी आहे.

kokan politics News : रायगड जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित झाले असून तशी घोषणाच भाजप नेते खासदार धैर्यशिल पाटील यांनी केली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी भाजप आपल्या सोबत येईल असे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. तर आता खासदार पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक पूर्व युती झालेलीआहे. त्या युतीच्या माध्यमातून आमच्याकडे आता पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आम्हीच सत्ता स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले जाण्याची शक्यता असून सर्वाधिक जागा जिंकूनही तहात हरल्याची स्थिती शिवसेनेची झाली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट निष्फळ ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी भाजप १५, राष्ट्रवादी १६ असे संख्याबळ आहे. तर कर्जत खालापुरमध्ये निवडणूकपूर्व राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेना अशी युती झाल्याचे शिवसेनेचे ४ सदस्य भाजप राष्ट्रवादी युतीबरोबर जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूरप्रमाणेच रायगडातही भाजपबरोबर सत्तेत सहभागी व्हावे, असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात असून त्यादृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये सध्या खलबत केली जात आहेत.

यादरम्यान तटकरे आणि भाजपचे धैर्यशिल पाटील यांनी भाजप राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा केली आहे. यामुळे आता रायगडात भाजप-राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित मानलेल जात असून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक २१ उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत.

यावरून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असतानाच गोगावले यांनीही भाजप आमच्या सोबत येईल असा विश्वास व्यक्त करत सत्ता स्थापनेकडे एक पाऊल पुढे टाकले होते. पण शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याबाबत जिल्ह्यात मतप्रवाह दिसत असल्याने भाजपने राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खा. धैर्यशील पाटील यांनी रायगडात जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक पूर्व युती झालेली आहे. त्या युतीच्या माध्यमातून आमच्याकडे आता पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आम्हीच सत्ता स्थापन करणार असल्याचे म्हटलं आहे.

तर तटकरे यांनी, जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करण्यात आली असून राज्यात महायुती आहे. या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली असू जि.प.मधील सत्ता स्थापनेबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरुनच होईल, असे म्हटलं आहे. तर याधीच तटकरे यांनी गोगावलेंनी भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी हात पुढे करताच भाजप आणि आमची निवडणूकपूर्व यूती असून आम्हीच सत्ता स्थापन करू, आम्ही यूती केलेल्या जागांपैकी 37 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेला आम्हाला कोणतीही अडचण नाही. यामुळेच जिल्हा परिषदेत आम्ही सत्तास्थापन करु असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान या घोषणेनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी भाजप, राष्ट्रवादीचे सदस्य गोव्यात असून अद्याप सत्ता कधी स्थापन होणार हे जाहीर झालेले नाही. सध्या यावर चर्चा सुरू असून आ.महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे म्हटलं आहे.

मात्र यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलाच ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यानंतर आता भाजपचे धैर्यशिल पाटील यांनी देखील भाजप राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा केल्याने शिवसेनेला सत्ते बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. तर तटकरेंनी मोठा गेम खेळत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या गोगावलेंना शह दिल्याची चर्चा रंगली आहे.

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाकडे बहुमत आहे?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांकडे एकूण 35 जागांचे संख्याबळ आहे.

2. शिवसेनेची भूमिका काय आहे?
सध्याच्या घडामोडीनुसार शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे.

3. भाजप-राष्ट्रवादी युतीबाबत कोणी संकेत दिले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार Sunil Tatkare आणि भाजप नेते खासदार Dhairyashil Patil यांनी युतीबाबत संकेत दिले आहेत.

4. रायगड जिल्हा परिषदेत एकूण किती जागा आहेत?
रायगड जिल्हा परिषदेत एकूण 59 जागा आहेत.

5. अधिकृत घोषणा कधी होणार?
सत्तास्थापनेबाबत वरिष्ठ पातळीवर अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT