Pravin Darekar BJP Sarkarnama
कोकण

Pravin Darekar BJP : राष्ट्रवादीचं स्टिअरिंग तटकरे-पटेलांकडे? प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं भाजपचा ‘गेमप्लॅन’ उघड!

Raigad Polls Aftermath: Sharad Pawar–Parth Pawar Meet, Pravin Darekar Reacts on NCP Merger : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्फोटक विधान केलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra political news : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार, यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अन् पवार कुटुंबिय काय भूमिका घेते, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत असताना, यावर भाजपने मित्रपक्षांशी सल्ला-मसलत करण्याची भूमिका मांडली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर भाजप पकड मजबूत करत असल्याचा सूर असताना, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी, अजितदादांची राष्ट्रवादी, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे सक्षमपणे पुढे नेऊ शकतात, असं विधान केलं आहे. या मुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या 'गेमप्लॅन'विषयी चर्चांनी जोर पकडला आहे.

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान सुरू आहे. मतदानाचा आढावा घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर, शरद पवार-पार्थ पवार यांच्या बैठकांवर तसंच, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत कोंडी होत आहे का? यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

दोन्ही राष्ट्रवादीचे (NCP) विलिनीकरणात, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कोंडी होत आहे का? यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पटेल अन् तटकरे यांची बाजू घेतली.

प्रवीण दरेकर म्हणाले, "पार्थ पवार अन् शरद पवार यांची भेटी होत आहेत. यात काहीच गैर नाही. ते कुटुंब आहे. कुटुंब दुःखात आहे. या काळात कुटुंबातील ज्येष्ठांची भेट घेणं, आणि ते राजकारणाशी जोडणं, हे योग्य नाही आणि त्याची आवश्यकता नाही. कोणाचीही अडचण होत नाही." प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे, हे त्यांचा पक्ष पुढे नेण्यास सक्षम आहेत, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अर्थ खाते भाजपने काढून घेतले, यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रवीण दरेकर यांनी, 'संजय राऊत यांनी बडबड करू नये, काही कारणच नाही. त्यांना काहीच काम नाही. अशा निराधार गोष्टींना मुख्यमंत्री उत्तर देत नसतात,' असा टोला लगावला.

'रायगड जिल्हा परिषदेत, विकास करायचा असेल तर, आपली माणसं असणे गरजेची आहे,' असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. 'भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीची युतीची प्रशंसा करत, या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून आम्ही निधी आणून जिल्ह्यात विकासाचा प्रयत्न करत आहोत. सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांची प्रशंसा करत,' एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना डिवचलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT