BJP mayor candidate controversy : सुरुवात झाली अन् सत्तेआधीच दुही माजली! भिवंडीत भाजपमध्ये ‘इनसाईड गेम’ रंगणार

Bhiwandi Mayor Row: BJP Rift After Narayan Chaudhary Name, Ravindra Chavan to Intervene : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीपूर्वी भाजपमधील वाद समोर आल्याने वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
Thane Bhiwandi
Thane BhiwandiSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Mayor Election : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेच्या महापौरपदावरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नारायण चौधरी यांचे नाव जाहीर करताच, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमीत पाटील यांनी त्यांच्या समर्थकांनी नाव पुढं केलं आहे.

या मुळे वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावर कसा तोडगा काढतात, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडी महापौरपदासाठी पुढाकार घेतला आहे. महापौरपदासाठी भाजपचे नारायण चौधरी यांचे नाव शहराध्यक्ष रवी सावंत यांना पत्राद्वारे रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी कळविले आहे. नारायण चौधरी यांच्या नावाचे शुभेच्छा बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल होताच, महापौरपदासाठी इच्छुक असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमीत पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत.

महापौरपदासाठी सुमीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समाज माध्यमांवर बॅनर व्हायरल आहेत. या मुळे चौधरी की, पाटील, असा संभ्रम भाजपमध्ये (BJP) तयार झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे. भिवंडी महापालिकेत भाजपचे 22, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 12, एक अपक्ष, असे 35 चे संख्याबळ आहे. बहुमतासाठी आवश्यक 46 ही संख्या पार करण्यासाठी, त्यांना 11 सदस्य कमी आहेत.

Thane Bhiwandi
Sunetra Pawar deputy CM oath : सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या अन् मोठं षडयंत्र हाणून पडलं; सुजय विखेंचा मोठा दावा

दरम्यान, भाजपकडून महापौरपदासाठी नारायण चौधरी व सुमीत पाटील हे दोघेही इच्छुक होते. याबाबत निर्णय घेण्याची विनंती शहर पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयाकडे केली होती. भाजप प्रदेश कार्यालयाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणारे लेखी पत्र आमच्याकडे आले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्व मान्य करतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.

Thane Bhiwandi
Sujay Vikhe : अजितदादांकडून 100 कोटी आणायचं ठरवलं होतं, पण..; महापौर निवडीत ‘नो घोडेबाजार’, विखे-जगतापांची कणखर भूमिका

'भिवंडी महापालिकेत भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी 15 नगरसेवक माझ्यासोबत देवदर्शनाला बाहेर आहेत. त्यातच नारायण चौधरी हे निवडणुकीआधीच भाजपमध्ये दाखल झाले असून ते पक्षाचे अधिकृत सदस्यदेखील नाहीत. तर भाजप नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा कशी करेल,' अशी प्रतिक्रिया सुमीत पाटील यांनी दिली.

पाटील फडणवीसांची भेट घेणार

तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्रावर जावक क्रमांक नाही. त्यामुळे पत्राबाबत साशंकता व्यक्त होते. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, याबाबत दाद मागणार आहे, अशी भूमिका सुमीत पाटील यांनी घेतली आहे.

चौधरी देखील ठाम

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाने अधिकृतपणे माझ्या नावाची घोषणा केली आहे. या संदर्भातील लेखी पत्रदेखील भाजप प्रदेश अध्यक्षांनी दिले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी महापौरपदाच्या नावासाठी माझी अधिकृत घोषणा झाली आहे, अशी कणखर भूमिका भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com