Uddhav Thackeray, Narayan Rane Sarkarnama
कोकण

Raj Thackeray Konkan : उद्धव ठाकरे अन् नारायण राणे यांच्यात 'असा' फरक; राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : 2014 ते 2019 सत्तेत बसला होतात. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्री होतात. असे उद्धव ठाकरे साडेसात वर्षे सत्तेत होते. मात्र त्यांच्या काळातही उद्योग बाहेर गेले. आधी नाणारला विरोध केला. त्यानंतर तो बारसुलाही विरोध केला.

Sunil Balasaheb Dhumal

Kankavli Political News : उद्धव ठाकरे साडेसात वर्षे सत्तेत होते. त्यातील अडीच वर्षे ते मुख्यमंत्री होते. तरी उद्योग धंदे बाहेर गेले. नारायण राणे फक्त सहा महिने मुख्यमंत्री होते. त्या मिळालेल्या काळात त्यांनी जो कामाचा सपाटा लावला होता तो वाखणण्याजोगा होता. बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर राज्यात राणे यांनी जोरदार काम केले. त्यांना पाच वर्षे मुख्यमंत्री राहता आले असते तर त्यांच्या प्रचारासाठी कुणालाही येण्याची गरज नसते अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंवर स्तुतीसुमने उधळली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग Ratnagiri Sindhudurg लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे शनिवारी (ता. ४) राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला. तर नारायण राणेंच्या कामाची पद्धत आणि विकासाच्या दृष्टीचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी त्यांनी कोकणात येणाऱ्या विविध प्रकल्पांना होत असलेल्या विरोधावरून ठाकरेंनी धारेवरही धरले.

राज ठाकरे Raj Thackeray म्हणाले, 2014 ते 2019 सत्तेत बसला होतात. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्री होतात. असे उद्धव ठाकरे साडेसात वर्षे सत्तेत होते. मात्र त्यांच्या काळातही उद्योग बाहेर गेले. आधी नाणारला विरोध केला. त्यानंतर तो बारसुलाही विरोध केला. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की भामा अनु न्यूक्लियर प्रकल्प मुंबईत आहे. मूळात त्यांना कोकणचा विकासच नकोय. येथे विकास झाला तर रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही. त्यामुळे नारायण राणेंना मत म्हणजे विकासाला मत, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभ्यास करून त्यावर मुद्देसूद बोलण्याची हतोटी नारायण राणेंची Narayan Rane आहे. विरोधी पक्षनेते असताना त्यांना बालमृत्यू, कुपोषणाबाबत काही माहिती नव्हते. मात्र १५ मिनिटांच्या चर्चेवर तब्बल तास अभ्यास करून सविस्तर बोलले. त्यामुळे सभागृहात जाऊन आपल्या प्रश्न मांडणारा खासदार हवा की तेथे जाऊन बसणारा खासदार हवा, असा प्रश्न करत राज ठाकरेंनी राणे यांना मतदान करण्याचे आवाहान केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT