Vijaysingh Mohite Patil : 'शरद पवारांनी आपल्या चुका पदरात घेतल्या; आता...'

Madha Lok Sabha Constituency : विविध सभांना उपस्थित राहूनही विजयसिंह मोहिते पाटील कधी बोलले नाहीत. मात्र अकलूजच्या शरद पवारांच्या सभेत ते पुतण्या धैर्यशील यांच्यासाठी दोन शब्द बोलले. यावेळी त्यांच्या हातात सुमारे मिनिटभर माईक होता. त्यातील 20 सेंकद ते मोजकेच बोलले पण थेट बोलले.
Vijaysingh Mohite Patil
Vijaysingh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Akluj Political News : राज्यात बारामतीनंतर माढा लोकसभा मतदारसंघातील 'हायव्होल्टेज ड्रामा'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपात बंडखोरी करून मोहिते पाटील कुटुंब माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना Dhairyasheel Mohite Patil लढण्यावर ठाम राहिले. भाजपकडून उमेदवारी डावलल्यानंतर मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी त्यांना हात देत माढ्यातून धैर्यशील यांना उमेदवारीही दिली. आता आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली आहे. परिणामी ही लढत अटीतटीची होत असल्याचे दिसून येत आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते कुटुंबियांनी संपूर्ण माढा मतदारसंघ पिंजून काढला आहे. शरद पवारांनीही आपली ताकद लावून विविध ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. या सभांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील Vijaysingh Mohite Patil उपस्थित राहूनही कधी बोलले नाहीत. दरम्यान, शनिवारी (ता. 4) अकलूज येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटलांसाठी सभा घेतली. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील पुतण्या धैर्यशील यांच्यासाठी दोन शब्द बोलले. यावेळी त्यांच्या हातात सुमारे मिनिटभर माईक होता. त्यातील 20 सेंकद ते मोजकेच बोलले पण थेट बोलले.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत आहे. त्याच्या दोन दिवस आधीच विजयसिंह मोहिते पाटलांनी जनतेला तुतारीला मतदान करण्यासाठी आवाहन केले. तसेच शरद पवारांचेही Sharad Pawar जाहीर कौतुक केले. ते म्हणाले, आदरणीय साहेबांचे मनापासून स्वागत करतो. आपण ज्या चुका केल्या त्यासाठी त्यांनी आपल्याला मनापासून माफ केले आहे. आता त्यांनी आपल्याला मदत करायची भूमिका घेतली आहे. पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी धैर्यशीलभैयांना निवडून देण्याचे कार्य करावे, अशी सर्वांना विनंती करतो, असे आवाहन त्यांनी केली.

Vijaysingh Mohite Patil
CV Ananda Bose : ऐन लोकसभेच्या धामधुमीत राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; काय आहे प्रकरण?

दरम्यान, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांना साथ दिली. पवारांनीही त्यांना उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी दिली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या Ajit Pawar राजकीय डावपेचांना कंटाळून मोहिते पाटलांनी 2019 मध्ये पवारांची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाल्याचे बोलले जाते. माढ्यातील मोहिते कुटुंबाच्या ताकदीमुळे भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार झाले. मधल्या काळात मात्र निंबाळकर आणि मोहिते कुटुंबात तेढ निर्माण झाला. यातून त्यांनी निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला. मात्र भाजपने त्यांचा विरोध झुगारला. त्यानंतर मोहिते पाटलांनी पुन्हा पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Vijaysingh Mohite Patil
Mahadev Jankar : म्हणायचं होतं भाबडा, पण म्हणाले...'; बारामतीत अजितदादांबाबत जानकर हे काय बोलून गेले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com