Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
कोकण

Raj Thackeray : "चित्रपट थोडा रंजक दाखवावाच लागतो, इतिहास भयंकर रूक्ष असतो!"

Chetan Zadpe

ऱत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षसंघटन आढावा व बैठकीसाठी राज ठाकरे आज रत्नागिरीत दाखल झाले. आज रत्नागिरी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरही भाष्य करत, विविध मुद्द्यांवरही प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले, कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं करू नये, तुम्ही अॅथॉरिटी नाहीत. तज्ञ लोकांकडून आणि कागदपत्रातून त्या गोष्टी तपासाव्यात. माझं असंपूर्ण म्हणणं आहे की, जो कोणी लेखक, जो कोणी चित्रपट करतोय, एकदा तज्ञ लोकांशी बोला. योग्य बाबी तपासून घेतलं पाहिजे. असल्या कोणत्याही गोष्टी करायाच्या नाहीत, केवळ विरोध करत बसायचं, याला काय अर्थ आहे. यामुळे उद्या लोक म्हणतील की, शिवाजी महाराजांवर आम्हाला चित्रपट नकोच. दाखवायला नकोच आम्हाला. कोणीही उठतंय आणि इतिहासाबद्दल बोलायला लागलंय.

"आपल्याला इतिहासाबद्दल माहिती नसेल, वाचन नसेल, इतिहास तज्ञ आहेत, त्यांनी यात अह्यात घालवली आहे, त्यांना विचारा. बाकी, इतिहास दाखवताना थोडासा रंजक नाही दाखवला तर, इतिहास भयंकर रूक्ष वाटेल. तुम्ही तानाजी चित्रपट पाहिल्यावर कळेल, त्यात दाखवल्याप्रमाणे सगळं तसंच होतं का? ते जर रंजक दाखवलं गेलं नसतं तर तुम्ही बघितलं असता का तानाजी? अशा गोष्टी जगभर होतात. मात्रचित्रपट करताना, इतिहासाला डाग लागणार नाही याची काळजी घ्याावी. लोकांना स्फूर्ती मिळावी, याच्यासाठी चित्रपट असतात, असे राज ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT