Rajan Salvi ACB Inquiry : Uddhav Thackeray : Rajan Salavi
Rajan Salvi ACB Inquiry : Uddhav Thackeray : Rajan Salavi Sarkarnama
कोकण

Rajan Salvi ACB Inquiry : ठाकरे गटाच्या आमदारांच्या घराचे मोजमाप, साळवींना अश्रू अनावर; एसीबीची कारवाई!

सरकारनामा ब्यूरो

Rajan Salvi ACB Inquiry : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते व कोकणातील आमदार राजन साळवी एसीबीच्या रडावर आहेत. साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. एसीबीने दिलेल्या नोटीसीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराचं मूल्यांकन केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना, त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांना अश्रू रोखता आल्या नाही.

राजन साळवी म्हणाले, "गेल्या चार महिन्यांपासून एसीबीकडून माझ्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे. चौकशीत मी माझ्या मालमत्तेची सगळी माहिती दिली आहे, तरी त्यांचं समाधान काय होत नाही. सतत मला अलिबागला बोलवंलं जातं. त्यांना मी माहिती देतो. माझ्या वडीलोपार्जित घराची त्यांनी मोजमाप केली. माझ्या राहत्या घराची देखील चौकशी केली आहे."

"माझ्या राहत्या घरावर मोजमापासाठी टेप लावलं, हे पाहून मला खूप भरून आलं. स्वकष्टाने हे घर मी उभं केलं आहे. जुनं घर तर वडीलोपार्जित आहे. हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून मी ते उभं केलं आहे. आठ वर्षापूर्वी जागा घेऊन मी घर बांधलं आहे. घरावरती सुद्धा जनता सहकारी बँकेचं रत्नागिरीचं पंचवीस लाखाचं कर्ज आहे. व्यवसायाच्या माध्यमातून जे चार पैसे मिळतात त्यातून हे घर उभं केलं आहे. माझ्या कष्टाच्या घराला आज आज टेप लावताना पाहायला मिळालं," असे साळवी म्हणाले.

"एखाद्या चित्रपटात प्रसंग असावा की, घर लिलावात निघतं. मोजपट्टी करून घरातलं सामान बाहेर काढलं जातं, अशा प्रसंग माझ्यासाऱख्या सामान्य आमदारावर ओढवलेला आहे. हे माझ्यासाठी अत्यंत दुख:द घटना आहे. माझे अश्रू या सरकारला बाधतील. असा प्रसंग शत्रूवरही ओढावू नये, अशी माझी भावना आहे," असे राजन साळवी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT